आजचा दिवस भारतीय विसरणार नाही, पाहा दहशतवाद्यांचा कॅम्प उद्ध्वस्त करणारा बालाकोट एअर स्ट्राइकचा VIDEO

आजचा दिवस भारतीय विसरणार नाही, पाहा दहशतवाद्यांचा कॅम्प उद्ध्वस्त करणारा बालाकोट एअर स्ट्राइकचा VIDEO

गेल्या वर्षी याच दिवशी पुलवामात सीआरपीएफ ताफ्यावर झालेल्या आत्मघाती हल्ल्यानंतर भारताने बालाकोटमध्ये एअर स्ट्राइक केला होता.

  • Share this:

नवी दिल्ली, 26 फेब्रुवारी : आजचा हा दिवस कोणताही भारतीय विसरणार नाही. कारण, गेल्या वर्षी याच दिवशी पुलवामात सीआरपीएफ ताफ्यावर झालेल्या आत्मघाती हल्ल्यानंतर भारताने बालाकोटमध्ये एअर स्ट्राइक केला होता. या एअरस्ट्राइकचा व्हिडिओ भारताच्या हवाई दलाने जारी केला होता. या व्हिडिओत दहशतवादी तळ उद्ध्वस्त केल्याचं दिसतं आहे. पाकिस्तान व्याप्त काश्मीरमधील बालाकोटमध्ये जैश ए मोहम्मदच्या तळांना भारतीय हवाई दलाने एअर स्ट्राइक करून उद्ध्वस्त केलं होतं.

भारतीय वायुदलाने पाकव्याप्त काश्मिरमध्ये मुजफ्फराबाद, चकोटी, बालाकोटमधील अनेक परिसरात बॉम्ब हल्ले केले होते. या एअर स्ट्राइकमध्ये जैश-ए-मोहम्मदचे अनेक दहशतवादी ठार झाले. सुमारे 200 ते 300 दहशतवादी या हल्ल्यात ठार झाले. भारतीय वायुसेना पाकव्याप्त काश्मीरमध्ये सुमारे 60 किमी आत घुसली होती. यावेळी 'मिराज 2000' या 12 लढाऊ विमानांनी दहशतवाद्यांच्या तळावर हल्ला करत त्यांचे सर्व तळ नेस्तनाबूत केले होते.

भारताकडून लेझर गायडेड बॉम्ब हल्ला करण्यात आला होता. सुमारे 21 मिनिटं भारताने दहशतवाद्यांच्या या तळांवर एअर स्ट्राइक केलं होतं. यावेळी पाकिस्तानाकडून प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण त्याआधीच भारतीय विमानं एअर स्ट्राइक करून भारतात परतली होती.

First published: February 26, 2020, 9:17 AM IST
Tags:

ताज्या बातम्या