Bajaj ने लाँच केली Avenger 160 Street ABS; 'ही' आहेत फिचर्स आणि किंमत

Bajaj ने लाँच केली Avenger 160 Street ABS; 'ही' आहेत फिचर्स आणि किंमत

नवं मॉडेल जुन्या मॉडलपेक्षा 7,000 रुपयांनी स्वस्त

  • Share this:

मुंबई, 5 मे : Bajaj Auto ने आपली नवी बाइक Bajaj Avenger 160 Street ABS लाँच केली आहे. कंपनीने ही बाइक नवीन सुरक्षा मानकांनुसार एंटी लॉक ब्रेकिंग सिस्टम (ABS) सह लाँच केली आहे.  Bajaj Avenger Street 160 ABS ची एक्स-शोरूम किंमत 81,037 रुपये आहे. हे नवं व्हेरिएंट जुन्या मॉडलपेक्षा 7,000 रुपयांनी स्वस्त आहे. ही बाइक दिसायला Avenger 180 सारखीच आकर्षक आहे. बाइकचा हेडलॅम्प LED DRLS सह राउंड डिझाईन मध्ये आहे.

अशी आहेत फिचर्स -

Bajaj Avenger 160 Street ABS ला 160सीसी सिंगल सिलिंडर इंजिन लावण्यात आलं आहे. जे पल्सर NS 160 मध्ये लावण्यात आलं होतं. एयर कूल्ड इंजिन 8,500 rpm वर 15bhp ची पावर आणि 6,500 rpm वर 14.6Nm चा पीक टॉर्क जेनरेट करतं. या बाइकमध्ये 5 स्पीड गियरबॉक्स देण्यात आले आहेत. तसंच नव्या मानकानुसरा सुरक्षेसाठी सिंगल चॅनल ABS (अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टिम) देण्यात आलं आहे. तर कंपनीने ही बाइक काळ्या आणि लाल या दोन रंगात उपलब्ध करून दिली आहे.

Bajaj Avenger 160 Street ABS च्या मागील भागात ड्रम ब्रेक युनिट लावण्यात आलं आहे. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून या बाइकला Rear-Lift Protection (RLP) सेंसर लावण्यात आलं आहे. जे अपघात होण्यापासून वाचवतं.

या गाडीला ब्लॅक्ड आउट स्टायलिंग, LED DRL सह नवं हेडलॅम्प क्लस्टर, फोर्क गॅटर्स आणि अलाइव व्हील लावण्यात आले आहेत. मागच्या व्हीलमध्ये रियर-लिफ्ट प्रोटेक्शन (RLP) सेंसर देण्यात आलं आहे.

First published: May 5, 2019, 9:44 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading