'त्या' नियमाने इशान किशन धावबाद ठरला नसता, पाहा VIDEO

इशान किशन धावबाद होण्यापूर्वीच बेल्स पडल्या होत्या. नियमानुसार आधी बेल्स पडल्या असतील तर बाद करण्यासाठी वेगळा नियम आहे.

News18 Lokmat | Updated On: Apr 7, 2019 12:05 AM IST

'त्या' नियमाने इशान किशन धावबाद ठरला नसता, पाहा VIDEO

हैदराबाद, 6 एप्रिल : सनरायझर्स हैदराबाद आणि मुंबई इंडियन्समध्ये सुरू असलेल्या सामन्यात हैदराबादने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. मुंबईने 20 षटकांत 7 बाद 136 धावा केल्या. कर्णधार भुवनेश्वर कुमारचा गोलंदाजीचा निर्णय सार्थ ठरवत फिरकीपटू मोहम्मद नबीने मुंबईचा कर्णधार रोहित शर्माला बाद केलं. रोहित शर्माला 14 चेंडूत 11 धावाच करता आल्या. त्यानंतर सुर्यकुमार यादवला संदीप शर्माने बाद केलं. सुर्यकुमारने 8 चेंडूत 7 धावा केल्या. क्विटन डी कॉक 19 धावा काढून बाद झाला. त्याला एस कौलने बाद केले. त्यानंतर कृणाल पांड्या आणि इशान किशन लागोपाठ बाद झाले.

इशान किशन धावबाद झाला पण त्यावेळी जर स्टंप उखडली नसती तर तो बाद ठरला नसता. इशान क्रिजमध्ये पोहचण्याआधीच हैदराबादचा यष्टीरक्षक बेअरस्टोचा यष्टीला पाय लागल्याने बेल्स पडल्या होत्या. क्रिकेटच्या नियमानुसार बॉल हातात नसताना बेल्स पडल्यास फलंदाज त्यानंतर धावबाद होत नाही. जर धावबाद करायचे असेल तर त्यासाठी स्टम्प काढावे लागतात. इशान किशनच्यावेळी अनावधानाने बेल्स पडल्या आणि त्यानंतर नकळत बेअरस्टोकडून स्टंप उखडली गेली. त्यामुळे इशान किशनला बाद दिले.इशान किशननंतर कृणाल पांड्या 6 तर इशान किशन 17 धावांवर बाद झाले. त्यानंतर आलेल्या पोलार्डने केलेल्या फटकेबाजीमुळे संघाच्या 26 चेंडूत 46 धावा केल्या. यात 2 चौकार आणि 4 षटकारांचा समावेश होता. हार्दीक पांड्यालाही जास्त धावा करता आल्या नाहीत. त्याला 14 धावांवर राशिद खानने विजय शंकरच्या हाती झेल देण्यास भाग पाडले. त्यानंतर भुवनेश्वर कुमारने राहुल चहरला बाद केले. शेवटच्या षटकात केलेल्या फटकेबाजीने मुंबईला 136 धावांवर पोहचवले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 7, 2019 12:05 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...