S M L

बदलापूरमध्ये तब्बल साडेसात कोटींचं एमडी ड्रग्ज जप्त

आंबोलीमध्ये शाहिद शहा हा अमली पदार्थाची विक्री करण्यास येणार असल्याची गुप्त माहिती दया नायक आणि त्यांच्या पथकाला लागली होती.

Sachin Salve | Updated On: Apr 16, 2018 11:16 PM IST

बदलापूरमध्ये तब्बल साडेसात कोटींचं एमडी ड्रग्ज जप्त

बदलापूर, 16 एप्रिल : बदलापूरमध्ये 300 ग्रॅम वजनाचं एमडी म्हणजेच मेफेड्रोन हे अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहे. त्याची किंमत ही तब्बल साडेसात कोटींच्याही वर आहे.

आंबोलीमध्ये शाहिद शहा हा अमली पदार्थाची विक्री करण्यास येणार असल्याची गुप्त माहिती दया नायक आणि त्यांच्या पथकाला लागली होती. त्यानुसार सापळा रचून शाहिदला अटक करण्यात आली.  त्याची अधिक चौकशी केली असता बदलापूर एमआयडीसी परिसरातील शारदा केमिकल्स या रासायनिक कंपनी एमडी हे अमली पदार्थ बनवण्यात येत असल्याची माहिती त्याने दिली.

त्यानुसार, आंबोली पोलिसांच्या विशेष पथकाने बदलापूर पूर्व पोलिसांच्या सह या रासायनिक कंपनीवर शनिवारी धाड टाकली असता त्यांना द्रवरूपी साठा करण्यात आलेले ७५ लिटर एमडी हे अमली पदार्थ आणि ते बनवण्यासाठी लागणारे साहित्य आढळून आले. हा सर्व माल पोलिसांनी ताब्यात घेत नारायण पटेल याला अटक केली आहे. सध्या कंपनी सील करण्यात आली असून अधिक तपास आंबोली पोलीस करत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 16, 2018 11:16 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close