बदलापुरात इंद्रायणी एक्स्प्रेसला म्हैस धडकल्याने रेल्वे वाहतूक ठप्प !

बदलापूर रेल्वेस्थानकानजीक दुसऱ्या गाडीने उडवलेली म्हैस इंद्रायणी एक्स्प्रेसला येऊन धडकल्याने रेल्वे वाहतूक ठप्प झालीय. इंद्रायणी एक्सप्रेसच्या इंजिनचं कॅटल गार्ड डॅमेज झाल्याने इंद्रायणी एक्सप्रेस बंद पडली आहे. जोपर्यंत दुरुस्ती होणार नाही तो पर्यंत एक्सप्रेस पुढे जाऊ शकणार नाहीत.

Chandrakant Funde | News18 Lokmat | Updated On: Dec 1, 2017 09:45 AM IST

बदलापुरात इंद्रायणी एक्स्प्रेसला म्हैस धडकल्याने रेल्वे वाहतूक ठप्प !

01 डिसेंबर, बदलापूर : बदलापूर रेल्वेस्थानकानजीक दुसऱ्या गाडीने उडवलेली म्हैस इंद्रायणी एक्स्प्रेसला येऊन धडकल्याने रेल्वे वाहतूक ठप्प झालीय. इंद्रायणी एक्सप्रेसच्या इंजिनचं कॅटल गार्ड डॅमेज झाल्याने इंद्रायणी एक्सप्रेस बंद पडली आहे. जोपर्यंत दुरुस्ती होणार नाही तो पर्यंत एक्सप्रेस पुढे जाऊ शकणार नाहीत. परिणामी मध्यरेल्वेची वाहतूकही पूर्णपणे विस्कळीत झालीय. सकाळी ७ च्या सुमारास बदलापूर - वांगणी या दोन रेल्वे स्थानका दरम्यान हा अपघात झालाय.

डाऊन मार्गावर म्हणजेच कर्जत कडे जाणाऱ्या मार्गावर वाहतूक विस्कळीत झाल्याने अनेक लोकल आणि लांब पल्ल्याच्या गाड्या खोळंबल्या आहेत. बदलापूर आणि त्याच्या पुढच्या वांगणी नेरळ, कर्जत स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी आहे. दुरुस्ती झाल्याशिवाय लोकलचे वेळापत्रक असेच कोलमडलेले राहणार आहे. बदलापूर-वांगणीच्या दरम्यान झालेल्या रेल्वे अपघातानंतर लांब पल्ल्याच्या गाड्यांची वाहतूक बंद पडली होती. वाहतूक पूर्ववत होईपर्यंत पुण्याकडे जाणाऱ्या लांब पल्ल्यांच्या गाड्यांची वाहतूक ठाणे-दिवा-पनवेल-कर्जत या मार्गानं वळवण्यात आली आहे.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 1, 2017 09:45 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...