जेव्हा अमिताभ बच्चन अभिषेकला म्हणाले, ‘तुझ्यापेक्षा तर ऐश्वर्या चांगली आहे’

जेव्हा अमिताभ बच्चन अभिषेकला म्हणाले, ‘तुझ्यापेक्षा तर ऐश्वर्या चांगली आहे’

अभिषेक बच्चनपेक्षा ऐश्वर्या राय बच्चनची प्रसिद्धी जास्त आहे हे तर सारेच मान्य करतात. स्वतः अभिषेकलाही हे मान्य आहे.

  • Share this:

मुंबई, 29 एप्रिल- अभिषेक बच्चनपेक्षा ऐश्वर्या राय बच्चनची प्रसिद्धी जास्त आहे हे तर सारेच मान्य करतात. स्वतः अभिषेकलाही हे मान्य आहे. ऐश्वर्याचे फक्त भारतातच नाही जगभरात चाहते आहेत. बॉलिवूडमधील हिट अभिनेत्रींपैकी एक अशी ऐश्वर्याची आजही ओळख आहे. यात अमिताभ स्वतः अभिषेकला बोलले होते की, तुझ्यापेक्षा तिचा परफॉर्मन्स जास्त चांगला आहे. त्याचे झाले असे की, 'रावन' सिनेमाच्या ट्रेलर रिलीजवेळी अमिताभ यांनी मुलाला अभिषेकला हे म्हटलं होतं.

फक्त अर्जुन रामपालची गर्लफ्रेंडच नाही तर या अभिनेत्रीही लग्नाआधी राहिल्यात गरोदर

'रेडिफ'ला दिलेल्या मुलाखतीत अभिषेकने म्हटलं होतं की, ‘बाबा माझ्या दिशेने वळले आणि माझ्या खांद्यावर हात ठेवून शाब्बासकी दिली. माझ्यापेक्षा ऐश्वर्याचं काम चांगलं होतं असंही ते मला म्हणाले.’ यानंतर अभिषेक म्हणाला की, ‘मी माझ्या बायकोसोबत कधीच स्पर्धा करत नाही. मला स्वतःला वाटतं की, बॉलिवूडमधील उत्कृष्ट अभिनेत्रींपैकी ती एक आहे. तिचं काम बोलतं. मला कोणाशीही स्पर्धा करण्याची गरज नाही. माझी स्पर्धा फक्त माझ्याशीच आहे.’

मतदान केंद्रावर वरुण धवनने केली वृद्ध महिलेची मदत, उपस्थित म्हणाले वाह.. वाह...

आतापर्यंत अभिषेक आणि ऐश्वर्याने मोठ्या पडद्यावर 'ढाई अक्षर प्रेम के', 'कुछ ना कहो', 'रावन' या सिनेमांमध्ये काम केलं आहे. तर अमिताभ, ऐश्वर्या आणि अभिषेक यांनी सरकार २ मध्ये एकत्र काम केलं होतं. शिवाय तिघांनी कजरा रे गाण्यात एकत्र ताल धरला होता. तिघांचं हे गाणं तुफान हिट झालं होतं. आता असं म्हटलं जात आहे की, लवकरच अभिषेक आणि ऐश्वर्या ‘गुलाब जामुन’ सिनेमातून पुन्हा एकत्र दिसणार आहेत.

फक्त बॉलिवूड स्टारच नाही तर या मराठी सेलिब्रिटींनीही केलं मतदान

VIDEO: मुंबईत हेमा मालिनी यांनी केलं मतदान, मथुरेत आजमावणार नशीब

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 29, 2019 05:42 PM IST

ताज्या बातम्या