'दानवे-खोतकरांमध्ये सेटलमेंट झाली हे वेगळं सांगण्याची गरज नाही'

'दानवे-खोतकरांमध्ये सेटलमेंट झाली हे वेगळं सांगण्याची गरज नाही'

दानवे यांच्या विरोधात उभं राहणाऱ्या कुठल्याही सक्षम उमेदवारास आपण पाठिंबा देणार असून, लवकरच दानवे यांच्या घरासमोर नारळ फोडून दानवे विरोधात प्रचार करणार' असा इशाराही बच्चू कडू यांनी दिला आहे.

  • Share this:

विजय कमळे पाटील, प्रतिनिधी

जालना, 23 मार्च : 'जालना लोकसभेची जागा आपण लढलो किंवा नाही लढलो तरी शेतकऱ्यांना साले म्हणणाऱ्या भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या विरोधात आपण प्रचार करणार' असं प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी म्हंटलं आहे. जालन्यातून अर्जुन खोतकरांनी निवडणूक लढण्यासाठी आग्रह धरला होता पण नंतर आपली तलवार म्यान करत रावसाहेब दानवे यांना उमेदवारी देण्यात आली. त्यावरून बच्चू कडू यांनी टोला हाणला आहे.

दरम्यान, 'दानवे यांच्या विरोधात उभं राहणाऱ्या कुठल्याही सक्षम उमेदवारास आपण पाठिंबा देणार असून, लवकरच दानवे यांच्या घरासमोर नारळ फोडून दानवे विरोधात प्रचार करणार' असा इशाराही बच्चू कडू यांनी दिला आहे. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी खोतकरांवरही टीका केली आहे.

'खोतकरांनी आपण दानवे विरोधात लढणार असल्याचं शपथ घेत सांगितलं होतं. मात्र नंतर त्यांनी माघार घेऊन आम्हाला अडचणीत आणलं' असं बच्चू कडू म्हणाले. तर 'दानवे आणि खोतकरांमध्ये सेटलमेंट झाल्याचं वेगळं सांगण्याची गरज नाही' असं म्हणत त्यांनी खोतकरांना टोला लगावला आहे.

हेही वाचा : सपना चौधरी यांच्या काँग्रेस प्रवेशाचा सस्पेंस संपला, राहुल गांधी यांनी घेतला मोठा निर्णय

'अर्जूनानं धनुष्य खाली ठेवलं'

जालना लोकसभा मतदारसंघात भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि शिवसेना आमदार अर्जून खोतकर यांच्यातील वादावर पडदा पडला. शनिवारी उद्धव ठाकरे आणि पंकजा मुंडे यांनी प्रकरणात लक्ष घातलं होतं. त्यानंतर देखील अर्जून खोतकर यांनी माघार घेणार नाही अशी भूमिका घेतली होती. पण, त्यानंतर दानवे- खोतकर वाद शांत झाला आणि परिक्षेत मी पास होईन नंतर रावसाहेबांची परिक्षा असल्याचं अर्जून खोतकर यांनी म्हटलं होतं.

मी सच्चा शिवसैनिक आहे. जालन्यात लागलेली आणीबाणी आज उठली असून मी उद्धव ठाकरे यांच्या विरोधात गेलो नाही. आमच्या नेत्याचा निर्णय आम्हाला सर्वश्रेष्ठ असून आम्ही दगाफटका करणार नाही असं अर्जून खोतकर यांनी म्हटलं होतं. तसेच मी दिलेली जबाबदारी पूर्ण पार पाडणार असून मित्र मोठा झाला म्हणून छोट्या मित्रांना विसरू नका असा चिमटादेखील यावेळी खोतकर यांनी काढला होता.

अर्जुन खोतकर विरूद्ध रावसाहेब दानवे वाद

शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी थेट भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनाच आव्हान दिलं होतं. त्यामुळे जालन्याची ही जागा भाजपसाठी प्रतिष्ठेची ठरली होती. जालन्याची जागा आपणच लढवावी यासाठी अर्जुन खोतकर हट्टाला पेटले होते. ही जागा शिवसेनेकडे राहिली तर ती आपणच जिंकू शकतो, असं म्हणत अर्जुन खोतकर यांनी उद्धव ठाकरेंकडे या जागेची जोरदार मागणी केली होती.

दानवेंनी केली होती अडवणूक

रावसाहेब दानवे यांनी जालनामधल्या शिवसैनिकांना त्रास दिला, त्यांना खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवलं त्यामुळेच रावसाहेब दानवे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना सहकार्य करायला आपण तयार नाही, असं अर्जुन खोतकर यांनी उद्धव ठाकरेंना सांगितलं होतं. खोतकर यांच्या मतदारसंघातल्या विकासकामांमध्ये दानवेंनी अडथळे आणले, या प्रकल्पांचा निधीही अडवून धरला, अशी तक्रारही खोतकरांकडून करण्यात आली होती.

अर्जुन खोतकर यांचं जालन्यामधलं वर्चस्व वाढू नये म्हणून रावसाहेब दानवेंनी आपली खासदारकी, मंत्रिपद आणि प्रदेशाध्यक्षपदाचा वापर केला. खोतकरांचे कार्यकर्ते त्यांनी फोडले, अशीही चर्चा होती.

जालन्यामध्ये मोठ्या प्रमाणात लोहउद्योग आहे. या क्षेत्रातल्या उद्योगपतींचा पाठिंबा खोतकरांना मिळू नये म्हणून दानवेंनी हरतऱ्हेने प्रयत्न केले. एकंदरितच खोतकर यांचं राजकारणातून उच्चाटन करण्याचा दानवेंनी चंग बांधला होता, असा आरोप होतोय.

VIDEO: बारामतीतून उमेदवारी मिळाल्यानंतर कांचन कुल यांची पहिली प्रतिक्रिया'

First published: March 23, 2019, 11:51 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading