मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

अशा कंपनीला कामच कशाला दिले? बच्चू कडूंचा सरकारला घरचा अहेर

अशा कंपनीला कामच कशाला दिले? बच्चू कडूंचा सरकारला घरचा अहेर

'हे खरंच दुर्दैव आहे. जर एखादी संस्था ब्लॅकलिस्टेड असेल तर अशा कंपनीला काम का देण्यात येते. सर्व सामान्य विद्यार्थ्यांना अपेक्षा असते की...'

'हे खरंच दुर्दैव आहे. जर एखादी संस्था ब्लॅकलिस्टेड असेल तर अशा कंपनीला काम का देण्यात येते. सर्व सामान्य विद्यार्थ्यांना अपेक्षा असते की...'

'हे खरंच दुर्दैव आहे. जर एखादी संस्था ब्लॅकलिस्टेड असेल तर अशा कंपनीला काम का देण्यात येते. सर्व सामान्य विद्यार्थ्यांना अपेक्षा असते की...'

अमरावती, 18 ऑक्टोबर :  आरोग्य विभागाच्या परीक्षेबाबत (health department maharashtra exam) झालेल्या गोंधळामुळे संपूर्ण महाराष्ट्रात विद्यार्थ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. ही परीक्षा पारदर्शीपणे व्हावी यासाठी ही परीक्षा एमपीएससीमार्फत घेण्यात यावी अशी मागणी राज्याचे शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू (bacchu kadu) यांनी करत आपल्या सरकारला घरचा अहेर दिला आहे.

हॉल तिकीटांमध्ये घोळ झाल्यामुळे आरोग्य विभागाची परीक्षा रद्द करण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा एकदा नव्याने परीक्षा घेण्यात येत आहे. पण पुन्हा एकदा हॉल तिकीटांमध्ये घोळ पाहण्यास मिळत आहे. बच्चू कडू यांनी याबद्दल सरकारला थेट सवाल केला आहे.

'आरोग्य विभागाचे काम परीक्षेचे काम न्यास या कंपनीला देण्यात आलेला आहे. न्यास ही कंपनी ब्लॅक लिस्ट केलेली आहे, तरीही याच कंपनीला काम का देण्यात आला असा राज्यातील विद्यार्थ्यांचा आक्षेप होता. त्यामुळे अशा कंपनीला काम देण्यात येऊ नये, असं बच्चू कडू म्हणाले.

माझी मुलंच माझं विश्व, मी जे काही करते ते त्यांच्यासाठीच करते: मंदिरा बेदी

तसंच, रात्रंदिवस विद्यार्थी हे रक्ताचं पाणी करून अभ्यास करत असतात. तुम्ही जर निकाल पाहिला तर मेरिट येणारे विद्यार्थी हे फार कमी आहे. राज्य सरकारने पारदर्शीपणे घ्यावी. राजेश टोपे यांच्या कामावर आम्हाला अजिबात संशय नाही. पण ही परीक्षा सगळ्या जाती धर्माचे विद्यार्थी रक्ताचे पाणी करून  प्रामाणिकपणे परीक्षेची तयारी करतात त्यामुळे या परीक्षेत घोळ होऊ नये, असंही बच्चू कडू म्हणाले.

पेट्रोल पंपावरील टॉयलेटमध्ये गेलेल्या महिलेसोबत घडलं अनपेक्षित; पाहताच पती अवाक

'हे खरंच दुर्दैव आहे. जर एखादी संस्था ब्लॅकलिस्टेड असेल तर अशा कंपनीला काम का देण्यात येते. सर्व सामान्य विद्यार्थ्यांना अपेक्षा असते की, तो चांगला अभ्यास करेल, काही त्यांचा निकाल चांगला येईल, पण आता अशामुळे हे संपलं की काय? असा सवालही बच्चू कडू यांनी उपस्थितीत केला.

काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनीही हॉल तिकीटांच्या घोळावर नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर आता बच्चू कडू यांनीही निशाणा साधला.

First published: