Home /News /news /

अजब! भारतात जन्मली 3 हात आणि 2 डोकी असणारी चिमुकली, दोन्ही नाकाने घेतेय श्वास

अजब! भारतात जन्मली 3 हात आणि 2 डोकी असणारी चिमुकली, दोन्ही नाकाने घेतेय श्वास

रविवारी सकाळी ओडिशातील केंद्रपाडा येथील एका महिलेनं 2 शीर आणि 3 हात असणाऱ्या एका चिमुकलीला जन्म दिला आहे. केंद्रपाडा येथील एका खाजगी रुग्णालयात बाळाचा जन्म झाला आहे.

    भुवनेश्वर, 13 एप्रिल: रविवारी सकाळी ओडिशातील केंद्रपाडा येथील एका महिलेनं 2 डोकं आणि 3 हात असणाऱ्या एका चिमुकलीला जन्म दिला आहे. केंद्रपाडा येथील एका खाजगी रुग्णालयात बाळाचा जन्म झाला आहे. बाळाची स्थिती सध्या स्थिर असून उपाचार सुरू आहेत. अशा प्रकारचं बाळ जन्माला आल्यानं तिच्या प्रकृतीविषयीच्या चिंता बाळाच्या आई वडिलांना सतावत आहे. त्यामुळे बाळाच्या वडिलांनी ओडिशा सरकारकडे बाळासाठी मदतीची मागणी केली आहे. संबंधित महिला दुसऱ्यांदा आई बनली आहे. यावेळी तिने दोन डोकी आणि तीन हात असणाऱ्या बाळाला जन्म दिला आहे. बाळाचे दोन्ही तोंड आणि नाक चांगल्याप्रकारे विकसित झालं आहे. बाळाला दोन्ही तोंडातून खायला घातलं जातं आहे. शिवाय दोन्ही नाकांनी बाळाचा श्वासोच्छवास सुरू आहे. सध्या बाळावर केंद्रपाडा येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यानंतर विशेष देखभालीसाठी बाळाला कटक येथील सरदार वल्लभभाई पटेल पीजी इंन्स्टिस्टुट ऑफ पेडियाट्रिक्स याठिकाणी हलवण्यात आलं आहे. रविवारी सकाळी केंद्रपाडा येथील एका  खाजगी रुग्णालयात सीजेरियन ऑपरेशनद्वारे बाळाचा जन्म झाला आहे. ही एक दुर्लभ वैद्यकीय गुंतागुंत असल्याचं डॉक्टरांनी म्हटलं आहे. पण सध्या बाळाची प्रकृती स्थिर असून संबंधित प्रकार 'सियामीज ट्विन्स'चा असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे. वेळेवर चेक अप आणि औषधोपचार न केल्यानं अशी स्थिती उद्भवते असंही डॉक्टरांनी सांगितलं आहे. (वाचा- OMG! Mermaid baby, जन्माला आलं माशासारखं शरीर असलेलं बाळ) बाळाचे आईवडिल ओडिशातील केंद्रपाडा जिल्ह्यातील राजनगर क्षेत्रातील कानी या गावचे रहिवासी आहेत. बाळाच्या वडिलांनी उपचारासाठी ओडिशा सरकारकडे मदत मागितली आहे. या बाळाला मदत करण्याची अद्याप कोणतीही घोषणा ओडिशा सरकारकडून केली गेली नाही. पण बाळाचं ऑपरेशन केलं तर बाळाला वेगळं करता येऊ शकतं असा विश्वास डॉक्टरांना आहे. यापूर्वी छाती आणि धड जोडलेल्या एका ट्विन्स बाळाला वेगळं करण्यात आलं आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Odisha

    पुढील बातम्या