परभणी,ता.24 जून : साम दाम दंड भेदचा उपयोग करून निवडणुका जिंका पक्ष तुमच्या पाठिशी उभा आहे असं वक्तव्य बबनराव लोणीकर यांनी केलंय. मुख्यमंत्र्यांच्या साम दाम दंड भेद या वक्तव्याचा विसर पडत नाही तोच आता राज्याचे पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनीही तसंच वक्तव्य केल्याने नवा वाद होण्याची चिन्हं आहेत.
परभणीच्या कृष्ण गार्डन मंगल कार्यलयात भाजपकडून बूथ कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता त्यावेळी ते बोलत होते. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष राबसाहेब दानवे यांनी बोलताना स्वबळाचा नारा दिला.
हिंगोलीमध्ये स्त्रीरोग रुग्णालयात 36 तासांपासून वीज नाही, बाळंतिणी झोपल्या रस्त्यावर
पंढरपुरात शिक्षणाचा खर्च वडिलांना झेपत नसल्यानं मुलीनं संपवलं आयुष्य
लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीला अजून वेळ असला तरी भाजपने निवडणूकीची जोरदार तयारी सुरूवात केली. त्याचाच एक भाग म्हणून हा मेळावा आयोजित करण्यात आला होता. शिवसेनेनं युती केली तर त्यांच्यासोबत नाही तर स्वबळावर लढण्याची लढण्याची तयारी असल्याचं लोणीकर आणि दानवे यांनी कार्यकर्त्यांना सांगितलं.
निवडणूका कुठल्याही परिस्थितीत जिंकायच्याच हा भाजपचा आत्तापर्यंतचा दृष्टिकोन आहे. त्यामुळं विरोधी पक्ष सातत्याने भाजपवर टीका करतात. सत्तेसाठी भाजप कुठल्याही थराला जावू शकते या विरोधकांच्या आरोपाला आणखी धार येणार आहे.