‘श्री राम हे मुस्लिमांचे देखील पूर्वज; अयोध्येमध्ये उभारणार राम मंदिर’

‘श्री राम हे मुस्लिमांचे देखील पूर्वज; अयोध्येमध्ये उभारणार राम मंदिर’

Ram Mandir and Baba Ramdev : श्री राम हे हिंदु, मुस्लिमांशिवाय देशाचे पूर्वज असल्याचं विधान बाबा रामदेव यांनी केलं आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 21 जून : योगगुरू बाबा रामदेव यांनी केलेल्या विधानावरून आता पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फुटलं आहे. श्री राम हे हिंदु, मुस्लिमांचेच नाहीत तर देशाचे वंशज असल्याचं बाबा रामदेव यांनी म्हटलं आहे. तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काळात अयोध्येमध्ये राम मंदिराची उभारणी केली जाणार असल्याचं देखील बाबा रामदेव यांनी म्हटलं आहे. नांदेड येथे योग दिवसाच्या निमित्तानं बाबा रामदेव आले होते. त्यावेळी त्यांनी हे विधान केलं आहे. मुसलमान आमचे भाऊ आहेत आणि आमचे पूर्वज एकच असल्याचं बाबा रामदेव यांनी म्हटलं आहे. आपणा सर्वांना आपल्या पूर्वजांचा तिरस्कार करून चालणार नाही तर त्यांचा गौरव वाढवला पाहिजे असं देखील बाबा रामदेव यांनी म्हटलं आहे.

राम मंदिराबाबत काय म्हणाले बाबा रामदेव?

राम मंदिराचा मुद्दा सध्या न्यायप्रविष्ठ आहे. त्यावर सर्वोच्च न्यायालय लवकरच निर्णय देईल अशी अपेक्षा बाबा रामदेव यांनी व्यक्त केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळामध्ये अयोध्येमध्ये राम मंदिराची बांधणी होईल असं देखील बाबा रामदेव यांनी म्हटलं आहे.

राम मंदिराचा मुद्दा न्यायप्रविष्ठ

2014च्या लोकसभा निवडणुकीमध्ये प्रचारदरम्यान भाजप सरकारनं अयोध्येमध्ये राम मंदिराची उभारणी करण्याचं आश्वासन दिलं होतं. सध्या राम मंदिराचं प्रकरण हे सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणीसाठी आहे.

VIDEO: शिवसेना-काँग्रेस नगरसेवकांमध्ये तुफान राडा

First published: June 21, 2019, 3:36 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading