S M L

हरियाणातील रहीम समर्थकांच्या हिंसाचारात 32 ठार ; मोदींकडूनही निषेध

या हिंसाचारामुळे संतापलेल्या हायकोर्टाने बाबा रहीमची सर्व संपत्ती जप्त करण्याचे आदेश दिलेत.बाबा रहिमच्या समर्थकांनी घडवून आणलेल्या हिंसाचारात आतापर्यंत 32 ठार, 250 जखमी झालेत.

Sachin Salve | Updated On: Aug 25, 2017 09:40 PM IST

हरियाणातील रहीम समर्थकांच्या हिंसाचारात 32 ठार ; मोदींकडूनही निषेध

पंचकूला, हरियाणा, 25 ऑगस्ट : साध्वी बलात्कार प्रकरणी बाबा रहीमला सीबीआय कोर्टाने दोषी ठरवताच त्याच्या समर्थकांनी रहियाणात ठिकठिकाणी हिंसाचार सुरू केलाय. पंचकूला कोर्ट परिसर लष्कराच्या ताब्यात असूनही तिथंही जमावाने हल्ला चढवलाय. हायवे, रेल्वे स्टेशनवरही जाळपोळ करण्यात आलीय. न्यूज चॅनल्सच्या दोन ओबी व्हॅन्सही जाळण्यात आल्यात. सिरसा भागात न्यूज 18च्या प्रतिनिधींवरही बाबा रहीमच्या समर्थकांनी हल्ला केलाय. या हिंसाचारामुळे संतापलेल्या हायकोर्टाने बाबा रहीमची सर्व संपत्ती जप्त करण्याचे आदेश दिलेत. बाबा रहिमच्या समर्थकांनी घडवून आणलेल्या हिंसाचारात आतापर्यंत 32 ठार, 250 जखमी झालेत. दिल्लीतही 10 ठिकाणी हिंसाचाराच्या घटना घडल्याने, पोलिसांनी 11 झोन्समध्ये जमावबंदीचे आदेश दिलेत. दरम्यान, राष्ट्रपतींसह पंतप्रधान मोदींनीही या हिंसाचाराचा कठोर शब्दात निषेध करत लोकांना शांतता राखण्याचं आवाहन केलंय.

दरम्यान, बाबा रहीमला अटक झाल्यानंतर तात्काळ विशेष विमानाने रोहतकच्या जेलमध्ये हलवण्यात आलंय. जमावाला आटोक्यात आणण्यासाठी सुरक्षा दलाकडून अश्रूधुराची नळकांडी फोडण्यात आलीत. तणावग्रस्त भागातली इंटरनेट सेवा बंद करण्यात आलीय. अनेक ठिकाणी संचार बंदी लागू करण्यात आलीय तरीही बाबा समर्थकांचा हिंसक जमाव नियंत्रणात येण्याची कोणतीच चिन्ह दिसत नाहीत. खबरदारी म्हणून लष्कराला पाचारण करूनही बाबा समर्थकांनी हरियाणात हिंसाचार घडवून आणला आहे. यामुळे रहियाणातील भाजपच्या खट्टर सरकारचं अपयश पुन्हा चव्हाट्यावर आलंय. हरियाणात जमावबंदीचे आदेश असूनही एवढ्या मोठ्या प्रमाणावर बाबा रहीमचे समर्थक एवढा हिंसाचार करूच कसा शकतात, असा सवाल कोर्टाने उपस्थित केलाय.

काय आहे बाबा रहीमचं बलात्कार प्रकरण ?

बाबा राम रहिमवर त्याच्याच आश्रमातील एका साध्वीने बलात्काराचा आरोप केलाय. यासंबंधी तिने आपल्यावरील अन्यायाची थेट पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना एक चिठ्ठीही लिहिली होती. पण बाबावर काहीच कारवाई झाली नाही. अखेर एका स्थानिक दैनिकाने या पीडीत मुलीची चिठ्ठी छापताच हे बलात्कार प्रकरण चव्हाट्यावर आलं. हे प्रकरण दडपण्यासाठी बाबा रहीमच्या समर्थकांनी या पीडित साध्वीचा भाऊ आणि ती चिठ्ठी छापलेल्या दैनिकाच्या संपादकीचीही हत्या केलीय. साधारण 2002सालचं हे प्रकरण आहे. खरंतर स्थानिक पोलिसांनी बाबा रहीमच्या दबावापुढे हे सर्व प्रकरण दडपण्याचा प्रयत्न चालवला होता. पण संपादक रामचंद्र यांची बाबा रहीमच्या समर्थकांनी गोळी घालून हत्या करताच हे सपूर्ण प्रकरण सीबीआयकडे देण्यात आलंय. त्याचीच सुनावणी आता अंतिम टप्प्यात आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 25, 2017 07:30 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close