News18 Lokmat

‘ताहिराला कॅन्सर झालाय हे मला माझ्या वाढदिवसाला कळलं’, आयुष्मान खुराने केली ‘मन की बात’

आयुष्मान खुराना आणि ताहिरा कश्यपने २००८ मध्ये लग्न केलं. ते एकमेकांना लहानपणापासून ओळखत होते. या दोघांना वीराजवीर आणि वीरुष्का ही दोन मुलं आहे.

News18 Lokmat | Updated On: May 1, 2019 08:04 PM IST

‘ताहिराला कॅन्सर झालाय हे मला माझ्या वाढदिवसाला कळलं’, आयुष्मान खुराने केली ‘मन की बात’

मुंबई, 1 मे- आयुष्मान खुरानाची पत्नी ताहिरा कश्यप गेल्या वर्षभरापासून स्तनाच्या कर्करोगाशी लढा देत आहे. या कठीण प्रसंगातही तिने स्वतःला सकारात्मक ठेवलं असून फार हिंमतीने ती कर्करोगाशी दोन हात करत आहे. दरम्यानच्या काळात ताहिराच्या या आजारावर आयुष्मानने बोलणं टाळलं होतं. पण आता त्याने आपलं मन प्रसारमाध्यमांसमोर मोकळं केलं असून ताहिराच्या संघर्षाबद्दल आयुष्मानने सांगितलं.

एका मुलाखतीत आयुष्मान म्हणाला की, त्याला त्याच्या वाढदिवसाच्या दिवशीच ताहिराच्या कर्करोगाबद्दल कळलं होतं. यावेळी आयुष्मानने सांगितले की, ‘अंधाधुन’ आणि ‘बधाई हो’ या सिनेमाच्या प्रमोशनदरम्यानही तो ताहिराची काळजी घ्यायचा. ‘माझ्यासाठी हे कठीण होतं... फारच कठीण होतं. मी ती या काळात फार सकारात्मक होती. तिच्या या साहसालाच मला धन्यवाद म्हणायचे आहे. नाही तर आम्ही पूर्ण तुटलो असतो.'

जेव्हा 'हे' स्टार कपल दुष्काळग्रस्त गावातील ढाब्यावर भेळ आणि उसाचा रस पिताना

'मी दोन सिनेमांच्यामध्ये अडकलो होतो. मी अंधाधुन आणि बधाई होच्या प्रमोशनमध्ये होतो. मला याबद्दल माझ्या वाढदिवसाच्याच दिवशी कळलं. एवढंच काय तर १४ सप्टेंबरला आम्ही मनमर्जियां पाहून आलो आणि त्याच दिवशी आम्हाला याबद्दल कळलं.’

पाणी फाउंडेशनसाठी जेव्हा 'हे' मराठी स्टार्स वाहतात घाम

Loading...




 





View this post on Instagram




 

WARNING!! Before you swipe left, some pictures might not go down too well with your palette. But I am hoping there is a change in the perception of that one perfect flavour that we have always had. The last couple of months have been an extreme case of metamorphosis for me. And I am not categorising it whether it was from a caterpillar to a butterfly phase or vice versa. I could be the larva or the pupa or any other intermediate stage as each phase is unique and special. But there is a deep sense of acceptance when it comes to the life cycle of this creature. Taking a ‘leaf’ from this caterpillars life, I feel I have undergone a tremendous change mentally and physically too. From my obsession with long hair, associating beauty with rapunzel tresses, and hiding most of the time behind my hair (as I felt secure , lest my crooked nose, or freckles or pimples or simply not so chiseled face isn’t exposed) to losing my hair, wearing extensions and a cap, going bald to now a short crop. I am enjoying every phase because somehow with hair I lost my insecurity, my stupid notion of beauty and my complexes. I don’t know whether I’ll keep long hair or not, in either case I am not going to hide my face. I don’t claim to have refined beauty, but I have changed my own mindset and my biggest victory is changing the mindset and perception of my 7 year-old-son, the next generation. From running to get a cap and placing it on my head when I was losing my hair and had a bald patch to proudly introducing me to his friends when I was bald or now with short hair, I feel I am a part of a change. This post is dedicated to women of all shapes and sizes and to all those posts I get when they fret losing their hair during or after chemotherapy. You are beautiful now and always #acceptance #selflove #longhair #baldhead #shorthair #kifarakpaindahai #breastcancerawarenss #changingkarmaintomission


A post shared by tahirakashyapkhurrana (@tahirakashyap) on





आयुष्मान पुढे म्हणाला की, ‘ताहिरा मला म्हणाली की मला माझं आयुष्य सेलिब्रेट करायचं आहे आणि तिच्या या प्रवासात आम्ही दोघं एकत्र होतो. मला आनंद आहे की आता यातून बाहेर पडली आहे. यानंतर तिने याविषयी अनेक लेक्चरही दिले. ती खरंच प्रेरणादायी आहे.’

'तारक मेहता का उल्टा चश्मा'त नवीन ट्विस्ट, मालिकेत परत येऊ शकते दिशा वकानी

ताहिरा लवकरच एका सिनेमाचं दिग्दर्शनही करणार आहे. याबद्दल बोलताना आयुष्मान म्हणाला की, ‘हा महिला प्रधान सिनेमा आहे. मला तिच्यासोबत एकदा काम करायचं आहे. ती माझ्यासाठी काही तरी चांगलं घेऊन येईल अशी मला आशा आहे.’

आयुष्मान खुराना आणि ताहिरा कश्यपने २००८ मध्ये लग्न केलं. ते एकमेकांना लहानपणापासून ओळखत होते. या दोघांना वीराजवीर आणि वीरुष्का ही दोन मुलं आहे. लवकरच आयुष्मान ‘आर्टिकल १५’ सिनेमांत दिसणार आहे.

VIDEO : जेव्हा अमेरिकन झाले 'आर्ची' आणि 'माऊली', महाराष्ट्र दिनाच्या अशाही शुभेच्छा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 1, 2019 08:04 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...