PHOTOS निकालापूर्वीच मंदिराची तयारी झाली पूर्ण; बांधल्यावर असं दिसेल अयोध्येचं राम मंदिर

रामजन्मभूमीच्या वादावर सुप्रीम कोर्टात सुनावणी 16 ऑक्टोबरला पूर्ण झाली होती. सर्वाधिक काळ लांबलेल्या अयोध्या केसचा निकाल लागण्याच्या आधीच मंदिराच्या कामाला सुरुवात झाली होती. गेल्या तीन दशकांपासून अयोध्येत प्रस्तावित मंदिराच्या बांधकामांसाठी वापरण्यात येणाऱ्या दगडांचं कोरीव काम सुरू होतं.

News18 Lokmat | Updated On: Nov 9, 2019 09:32 AM IST

PHOTOS निकालापूर्वीच मंदिराची तयारी झाली पूर्ण; बांधल्यावर असं दिसेल अयोध्येचं राम मंदिर

सुप्रीम कोर्टात ऐतिहासिक अयोध्या केसचा निकाल शनिवारी 9 नोव्हेंबरला लागतोय. पण अयोध्येच्या कारसेवकपुरममध्ये राममंदिराचं काम कित्येक वर्षांपूर्वीच सुरू झालं आहे.

कारसेवकमपुरमच्या एका मोठ्या कार्यशाळेत भारताच्या विविध भागांतून भाविक येतात. काही लोक इथे उत्सुकतेपोटी येतात तर काही लोक या परिसराबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी स्थानिक गाईडला घेऊन येतात.

राम मंदिराच्या प्रस्तावित प्रतिकृतीला प्रमाण मानून दगडी कोरीव काम आणि खांबांवरचं नक्षीकाम या कार्यशाळेतच पूर्ण केलं जातंय. प्रत्यक्ष रामजन्मभूमीवर मंदिर उभारण्यासाठी यामुळे अजिबात वेळ लागू नये असं नियोजन करण्यात आलंय

कार्यशाळेच्या प्रभाऱ्यांनी सांगितलं की, 50 टक्क्यांहून अधिक दगडी नक्षीकाम पूर्ण झालं आहे. याचा अर्थ पहिला मजला पूर्ण आहे. आम्ही आशा करतो की अयोध्येच्या जमीन मालकीबद्दल सुप्रीम कोर्टकडून निर्णय आल्यावर आम्ही पायात दगड घालण्याचे काम सुरू करू.

या योजनेनुसार मंदिर 268 फूट लांब, 140 फूट रुंद आणि 128 फूट उंचीइतकं शिखर आहे.

Loading...

कार्यशाळेचे प्रभारी म्हणाले की, मंदिराच्या प्रत्येक बाजूला 106 खांब असतील आणि प्रत्येक खांबावर 16 मुर्ती असतील. अशा प्रकारे कारागिरांनी त्यांचे नक्षीकाम पूर्ण केलं आहे. मंदिराची पूर्व-निर्मितीची कामं सध्या भक्तांच्या 'वैयक्तिक' देणगीतून सुरू असल्याचंही त्यांनी सांगितलं.

श्रीरामाचं नाव लिहिलेल्या विटा खांबांसाठी वापरल्या आहेत. दगड तासण्याचं काम इथे 29 वर्षांपूर्वीच सुरू झालं होतं.

सुप्रीम कोर्टात बुधवारी 16 ऑक्टोबरला अयोध्या प्रकरणी सुनावणी संपली. न्यायालयाने निकाल राखून ठेवला होता. 40 दिवस सलग रामजन्मभूमी वादाविषयी सुनावणी सुरू होती.

मध्यंतरी अयोध्येतल्या या कार्यशाळेचं काम मंदावलं होतं. कारागिरांची संख्या कमी झालं होतं. पण खटल्याचा निकाल अपेक्षीत असल्याने त्याने वेग घेतला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 9, 2019 09:32 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...