Ayodhya Case: अयोध्येतला हा वाद नेमका काय आहे? काय घडलं आतापर्यंत?

Ayodhya Case: अयोध्येतला हा वाद नेमका काय आहे? काय घडलं आतापर्यंत?

अयोध्या प्रकरणी सुप्रीम कोर्ट आज निकाल देणार आहे. त्याआधी अनेक वर्षं घडलेल्या घडामोडींचा हा आढावा.

  • Share this:

मुंबई, 9 नोव्हेंबर : अयोध्या प्रकरणी सुप्रीम कोर्ट आज निकाल देणार आहे. त्याआधी जाणून घेऊया आतापर्यंत घडलेल्या घडामोडी...

1528 : अयोध्येत मशीद बांधण्यात आली आणि तिचं बाबरी मशीद असं नामकरण करण्यात आलं.

1853 : इथलं राम मंदिर तोडून इथे मशीद बांधण्यात आली, असा आरोप हिंदूंनी केला आणि त्यावरून हिंसाचार झाला.

1859 : ब्रिटिश सरकारने या वादग्रस्त जागेवर तारांचं कुंपण घातलं आणि हिंदू आणि मुस्लीमधर्मीयांना वेगवेगळ्या ठिकाणी प्रार्थना करण्याची परवानगी दिली.

1885 : हा वाद पहिल्यांदा न्यायालयात गेला. महंत रघुबर दास यांनी फैजाबाद कोर्टाकडून बाबरी मशिदीच्या जवळच राम मंदिर बांधण्याची परवानगी मागितली.

23 दिसंबर 1949 : सुमारे 50 हिंदूंनी मशिदीच्या मध्यभागी रामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली. यानंतर हिंदू नियमितपणे पूजा करू लागले. मुस्लिमांनी नमाज अदा करणं बंद केलं.

17 दिसंबर 1959 : निर्मोही आखाड्याने ही वादग्रस्त जागा आपल्याकडे हस्तांतरित करण्यासाठी खटला दाखल केला.

18 दिसंबर 1961 : उत्तर प्रदेश सुन्नी वक्फ बोर्डाने या जागेच्या मालकी हक्कासाठी खटला दाखल केला.

1984 : विश्व हिंदू परिषदेने अयोध्येत राम मंदिर उभारण्यासाठी मोहीम सुरू केली.

(हेही वाचा : सत्तेपासून दूर राहिलेले RSS चे भगतसिंग कोश्यारी आता बनलेत सत्तेचे केंद्रबिंदू)

9 नोव्हेंबर 1989 : तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांच्या सरकारने बाबरी मशिदीच्या जवळ मंदिराची कोनशिला बसवायला परवानगी दिली.

25 सितंबर 1990 : भाजपचे अध्यक्ष लालकृष्ण अडवाणींनी गुजरातच्या सोमनाथ ते उत्तर प्रदेशात अयोध्येपर्यंत रथयात्रा काढली.

नोव्हेंबर 1990 : लालकृष्ण अडवाणींना बिहारच्या समस्तिपूरमध्ये अटक झाली. भाजपने त्यावेळच्या व्ही. पी. सिंग सरकारचा पाठिंबा काढून घेतला.

6 डिसेंबर 1992 : हजारोंच्या संख्येने कारसेवक अयोध्येत गेले आणि त्यांनी बाबरी मशीद पाडली. यानंतर धार्मिक दंगली झाल्या. घाईघाईतच एक तात्पुरतं राम मंदिर बांधण्यात आलं.

एप्रिल 2002 : अयोध्येतल्या वादग्रस्त जागेच्या मालकीच्या खटल्यात 3 न्यायाधीशांच्या खंडपीठाने सुनावणी सुरू केली.

30 सप्टेंबर 2010 : अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठाने एक ऐतिहासिक निर्णय दिला. राम मंदिर, सुन्नी वक्फ बोर्ड आणि निर्मोही आखाडा या तिघांमध्ये ही वादग्रस्त जागा वाटून घेण्याचा हा निर्णय होता.

(हेही वाचा : 'मी ईश्वरसाक्ष शपथ घेतो की...' शिवसेनेची आधीच बॅनरबाजी सुरू)

9 मे 2011 : सुप्रीम कोर्टाने अलाहाबाद हायकोर्टाचा निर्णय रद्द केला.

21 मार्च 2017: सुप्रीम कोर्टाने या प्रकरणी परस्पर सामंजस्यातून तोडगा काढण्याची सूचना केली.

19 एप्रिल 2017 : सुप्रीम कोर्टाने बाबरी मशीद पाडल्याप्रकरणी लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, उमा भारती यांच्यासह भाजप आणि रा. स्व. संघाच्या काही नेत्यांच्या विरोधात गुन्हेगारी खटला चालवण्याचा आदेश दिला.

6 ऑगस्ट 2019 : अयोध्येच्या खटल्यात कोणताही तोडगा निघाला नाही. त्यानंतर 6 ऑगस्टपासून या प्रकरणी सुप्रीम कोर्टात रोज सुनावणी करण्यात आली.

===========================================================================================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 8, 2019 10:06 PM IST

ताज्या बातम्या