S M L

अर्थसंकल्प 2019

Associate Sponsors

कला दिग्दर्शक नितीन देसाईंनी स्वीकारला महाराष्ट्राच्या चित्ररथाचा प्रथम पुरस्कार

प्रजासत्ताक दिनानिमित्त राजपथावर साकारण्यात आलेल्या महाराष्ट्राच्या चित्ररथाला पहिला क्रमांक मिळालाय. या पुरस्काराचं आज संरक्षणमंत्री निर्मला सीतारमण यांच्या हस्ते वितरण करण्यात आलं. हा पुरस्कार चित्ररथाचे कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी स्वीकारला.

Sonali Deshpande | Updated On: Jan 28, 2018 02:43 PM IST

कला दिग्दर्शक नितीन देसाईंनी स्वीकारला महाराष्ट्राच्या चित्ररथाचा प्रथम पुरस्कार

दिल्ली, 28 जानेवारी : प्रजासत्ताक दिनानिमित्त राजपथावर साकारण्यात आलेल्या महाराष्ट्राच्या चित्ररथाला पहिला क्रमांक मिळालाय. या पुरस्काराचं आज संरक्षणमंत्री निर्मला सीतारमण यांच्या हस्ते वितरण करण्यात आलं. हा पुरस्कार चित्ररथाचे कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी स्वीकारला.

ज्या दिल्लीनं छत्रपतींच्या स्वराज्याला कायम कमी लेखलं, ज्या दिल्लीश्वरांशी झगडण्यात शिवरायांचं आयुष्य खर्ची पडलं त्याच दिल्लीत 10 राष्ट्रप्रमुखांच्या उपस्थितीत छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाची कीर्ती सांगणारा चित्ररथ दिमाखात अवतरला होता. या चित्ररथावर शिवरायांच्या राज्याभिषेकाचा सोहळा सादर करण्यात आला. महाराष्ट्राच्या चित्ररथाच्या सुरुवातीला किल्ल्याची प्रतिकृती असून त्यावर शिवरायांची अश्वारुढ प्रतिकृती दर्शवण्यात आली.

तर मध्यभागी रायगडाची प्रतिकृती असून त्या ठिकाणच्या मेघडंबरीत सिंहासनावर छत्रपती शिवराय विराजमान झाले. आभूषण देणारा दरबारी, त्याच्या शेजारी गागाभट्ट, तर या राज्याभिषेकासाठी उपस्थित असलेला इंग्रज अधिकारी सर हेन्री ऑक्सिजन दाखवण्यात आलं होतं. तर दरबारात छत्रपती शिवरायांच्या शेजारी बसलेल्या सोयराबाई आणि संभाजीराजे असून.चित्ररथाच्या मागच्या भागात आसनस्थ असलेल्या राजमाता जिजाऊ.एकूणच या चित्ररथाची संकल्पना कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी सादर केली होती. यावेळी राज्यपथावर राज्यसभा खासदार छत्रपती संभाजीराजे सहकुटुंब उपस्थित होते. महाराष्ट्राचा चित्ररथ येताच संभाजीराजे उभे राहिले आणि त्यांनी जय भवानी, जय शिवाजी,'जय शिवाजी"च्या घोषणा दिल्या.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 28, 2018 02:43 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close