'बिहारकडून मिळालं बक्षीस'; डीजीपी गुप्तेश्वर पांडेयच्या VRS वरुन संजय राऊतांचा सणसणीत टोला

'बिहारकडून मिळालं बक्षीस'; डीजीपी गुप्तेश्वर पांडेयच्या VRS वरुन संजय राऊतांचा सणसणीत टोला

सुशांत सिंह प्रकरणात चर्चेत आलेले डीजीपी गुप्तेश्वर पांडेय राजकारणात पदार्पण करणार अशी जोरदार चर्चा सुरू आहे

  • Share this:

पाटना, 23 सप्टेंबर : बिहारचे डीजीपी गुप्तेश्वर पांडेय (Gupteshwar Pandey) यांनी वीआरएस म्हणजेच वॉलेंटरी रिटायरमेंट घेतली आहे. आता यावरुन राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाला आहे. शिवसेना खासदार संजय राऊत (Shiv Sena Leader Sanjay Raut) हे यावर म्हणाले की, महाराष्ट्रावरील त्यांच्या 'राजकीय तांडव'मागील एजेंडा आता स्पष्ट झाला आहे. ते मुंबई प्रकरणात आपल्या वक्तव्यांतून राजकीय अजेंडा चालवित होते. ज्यासाठी बिहारच्या नितीश कुमार यांच्या सरकारने त्यांना बक्षीस दिलं आहे.

सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput Case) प्रकरणात जेव्हा महाराष्ट्र सरकारने तपास करण्यासाठी बिहारचे IPS विनय तिवारी यांना जबरदस्तीने क्वारंटाइन केलं होते, तेव्हा गुप्तेश्वर पांडेय यांनी सोशल मीडियावर महाराष्ट्र सरकारला घेरलं होतं. आता त्याच्या पार्श्वभूमीवर राऊतांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे.

व्हीआरएसनंतर बिहारचे डीजीपी गुप्तेश्वर पांडेय हे निवडणूक लढविणार असल्याची चर्चा आहे. संजय राऊत यावर म्हणाले की, जी पार्टी त्यांना उमेदवारी देईल त्या पक्षावर लोक विश्वास ठेवणार नाही. निवडणूक लढविणार असल्याच्या बातमीवर गुप्तेश्वर म्हणाले की, आतापर्यंत मी कोणतीही राजकीय पार्टी जॉइन केलेली नाही. निवडणूक लढविण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. माझ्या समाजसेवेबद्दल असेल, ते मी राजकारणात न येताही करू शकतो.

Published by: Meenal Gangurde
First published: September 23, 2020, 2:24 PM IST

ताज्या बातम्या