तब्बल 2500 CRPF जवान होते दहशतवाद्यांच्या निशाण्यावर...!

तब्बल 2500 CRPF जवान होते दहशतवाद्यांच्या निशाण्यावर...!

ज्या ठिकाणी जैश ए मोहम्मदने आयईडी बॉम्ब पेरले होते त्या ठिकाणी सीआरपीएफच्या ताफ्यात 70 पेक्षा जास्त गाड्या होत्या.

  • Share this:

पुलवामा, 14 फेब्रुवारी : जम्मू काश्मीरच्या अंवतिपोरामध्ये सीआरपीएफच्या ताफ्यात आयईडी बॉम्ब हल्ला करत दशहतवाद्यांनी मोठा हल्ला केला आहे. या हल्लामध्ये सीआरपीएफचे 20 जवान शहीद झाले आहेत तर अनेक जवान जखमी झाले असल्याची माहिती देण्यात आली आहे.

या स्फोटाची तीव्रता इतकी जास्त होती की, यामध्ये जवानांना घेऊन जाणाऱ्या बसचा अगदी भूगा झाला आहे. या भीषण हल्ल्यामध्ये 20 जवानांनी आपले प्राण गमावले आहेत. नुकत्याच झालेल्या उरी हल्ल्यानंतरचा हा वर्षातला हा सगळ्यात मोठा हल्ला मानला जात आहे.

उरीमध्ये सैन्याच्या ताफ्यावर सप्टेंबर 2016ला दहशतवादी हल्ला करण्यात आला होता. यात 19 जवानांचे प्राण गेले होते. हा उरी हल्लादेखील जैश ए मोहम्मदने केला होता.

ज्या ठिकाणी जैश ए मोहम्मदने आयईडी बॉम्ब पेरले होते त्या ठिकाणी सीआरपीएफच्या ताफ्यात 70 पेक्षा जास्त गाड्या होत्या. ज्यामध्ये तब्बल 2500 पेक्षा जास्त जवान प्रवास करत होते. यातल्याच एका गाडीला दहशतवाद्यांनी लक्ष केलं.

सीपीआरफचा हा ताफा श्रीनगरला जात होता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या पद्धतीने हा हल्ला केला गेला त्यानुसार हल्ल्याची आधिच रेकी करण्यात आली होती. त्यानंतर मोठ्या हुशारीने हल्ला करण्यात आला.

जम्मू काश्मीरमध्ये झालेल्या अनेक हल्ल्यांमध्ये जैश ए मोहम्‍मद ही दशहतवादी संघटना सहभागी होती. त्यांनी सुरक्षा दलांना लक्ष करत अनेक आत्मघातकी हल्ले केले आहेत. जैश ए मोहम्‍मदचा गँगस्टर मसूद अजहर आहे. जो पाकिस्तानमध्ये लपून बसला असल्याची माहिती आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, दहशतवाद्यांनी आधी सुरक्षा दलाच्या एका गाडीला निशाना बनवलं. त्यानंतर लगेचच गोळीबार करण्यात आला. गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार, हा दशतवादी हल्ला जम्मू-काश्मीरच्या सुरक्षा दलांच्या ताफ्यावर आणि त्यांच्या रहदारीच्या रस्त्यांवर IED हल्ला केला आहे.

पुलवामामध्ये दहशतवाद्यांचा भीषण हल्ला, ग्राऊंडवरून पहिला VIDEO

First published: February 14, 2019, 6:25 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading