S M L

अविनाश चव्हाणवर गोळ्या झाडणारा आरोपी निलंगेकरांचा माजी सुरक्षारक्षक!

या आरोपीशी माझा काहीही संबंध नसल्याचा खुलासा कामगार कल्याण मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी केलाय.

Sachin Salve | Updated On: Jun 27, 2018 07:11 PM IST

अविनाश चव्हाणवर गोळ्या झाडणारा आरोपी निलंगेकरांचा माजी सुरक्षारक्षक!

लातूर, 27 जून : स्टेप बाय स्टेप कोचिंग क्लासेसचा संचालक अविनाश चव्हाण हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेला आरोपी हा कामगार कल्याण मंत्री संभाजी पाटील निलंगेकरांचा माजी सुरक्षारक्षक असल्याची धक्कादायक बाबसमोर आलीय.

अविनाश चव्हाण याची रविवारी मध्यरात्री एक वाजेच्या शहरातील उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या महसूल कॉलनीजवळ अविनाश चव्हाणवर अज्ञात व्यक्तींनी गोळ्या घातल्या. त्यातली एक गोळी त्याच्या उजव्या छातीत लागण्यानं त्याचा जागीच मृत्यू झाला.

सनी लिओनला लातुरात आणणाऱ्या अविनाश चव्हाणची गोळ्या झाडून हत्या


या प्रकरणी गोळ्या झाडणारा आरोपी करणसिंह गहिरवाल याला अटक करण्यात आली. आरोपी करणसिंह हा कॅबिनेटमंत्री संभाजी पाटील निलंगेकरांचा माजी सुरक्षारक्षक आहे. पोलिसांनी अविनाश चव्हाण हत्या प्रकरणात ज्या पाच जणांना अटक केली आहे, त्यात कॅबिनेट मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांचा माजी सुरक्षारक्षक करणसिंह याचा समावेश असल्याचं समोर आलं आहे.

ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि व्हॉट्सअॅपवर संभाजी पाटील निलंगेकर आणि करण सिंह यांच्या घनिष्ट संबंधांचे पुरावे देणारे फोटो अवघ्या महाराष्ट्रात फिरू लागले. त्यामुळे मंत्र्यांचा माजी सुरक्षारक्षक हा सुपारी किलर आहे का, असे प्रश्न विचारले जात आहेत.

Loading...

क्लासचालकानेच दिली दुसऱ्या संचालकाच्या हत्येची सुपारी

दरम्यान, या आरोपीशी माझा काहीही संबंध नसल्याचा खुलासा कामगार कल्याण मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी केलाय. आरोपी करणसिंह गहिरवाल हा अगोदर माझ्या समवेत होता. नंतर तो वेगळ्या राजकीय संघटनेत सहभागी झाला आणि ही घटना अंतर्गत कलहातून झाली असल्याचंही निलंगेकर यांनी स्पष्ट केलं.

दरम्यान, अविनाश चवहाण हत्या प्रकरणी न्यायालयाने करण गहेरवार,चंदनकुमार शर्मा,शरद घुमे,महेशचंद्र गोगडे पाटील रेड्डी आणि अक्षय शेंडगे यांना न्यायालयाने आज ३ जुलैपर्यत पोलीस कोठडी सुनावली आहे.

हे पोलिसांचं अपयश -अमित देशमुख

तर, लातूरमध्ये क्लास चालकाच्या झालेल्या हत्येनंतर आमदार अमित देशमुख यांनी सरकारवर टीकेची झोड उठवलीय. शहरात कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला असून गोळीबार आणि खूनांची घटना म्हणजे पोलिसांचं अपयश असल्याचं ते म्हणालेत. पोलिसांनी वेळीच खबरदारी घेतली असती तर अविनाश चव्हाण खून प्रकरण टळलं असतं अशी टीकाही आमदार अमित देशमुख यांनी केलीय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 27, 2018 06:57 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close