S M L

भीमा कोरेगाव हिंसाचारप्रकरणी संभाजी भिडे, मिलिंद एकबोटे यांच्याविरोधात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

भीमा कोरेगाव दगडफेक प्रकरणात संभाजी भिडे गुरूजी आणि मिलिंद एकबोटेंवर अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. शिवाय खुनी हल्ला आणि दंगलीचीही कलमं लावण्यात आलीयेत. पिंपरी पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आलाय.

Chandrakant Funde | Updated On: Jan 2, 2018 07:45 PM IST

भीमा कोरेगाव हिंसाचारप्रकरणी संभाजी भिडे, मिलिंद एकबोटे यांच्याविरोधात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

02 जानेवारी, पुणे : भीमा कोरेगाव दगडफेक प्रकरणात संभाजी भिडे गुरूजी आणि मिलिंद एकबोटेंवर अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. शिवाय खुनी हल्ला आणि दंगलीचीही कलमं लावण्यात आलीयेत. पिंपरी पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आलाय. हा गुन्हा नंतर शिरूर पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात येणार आहे. दरम्यान मिलिंद एकबोटे यांच्यावर झालेले सर्व आरोप फेटाळलेत. या प्रकरणात आपल्याला जाणिवपूर्वक गोवल्याचं मिलिंद एकबोटेंनी म्हटलंय.

कोरेगाव भीमाच्या शौर्य दिनाच्या कार्यक्रमावेळी वडू बुद्रूकमध्ये दगडफेक झाली होती. त्यात एकाचा मृत्यू झाला तर अनेक गाड्यांची तोडफोड आणि जाळपोळ झाली होती. या घटनेचे आज राज्यभरात तीव्र पडसाद उमटलेत. अनेक ठिकाणी रास्तारोको, दगडफेक झाली. कार्यकर्तेही प्रचंड आक्रमक झालेत. त्याच दबावातून आज पिंपरीत शिव प्रतिष्ठानचे 'संभाजी भिडे यांचे आणि हिंदू एकता आघाडीचे मिलिंद एकबोटे यांच्या विरोधात अँट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दंगल भडकण्याचा आरोपही या गुन्ह्यात ठेवण्यात आलाय. भारतीय दंड विधान ३९५, ३०७ कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी या सर्व हिंसाचाराचे न्यायालयीन चौकशीचे आदेश दिलेत. तर प्रकाश आंबेडकरांनी उद्या महाराष्ट्र बंदची हाक दिली. शरद पवार आणि रामदास आठवले यांनी कार्यकर्त्यांना शांतता राखण्याचे आव्हान केलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 2, 2018 07:45 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close