नवी मुंबई, 29 ऑगस्ट : वाशी वाहतूक पोलिसांतर्फे वारंवार होत असलेल्या कारवाई विरोधात वाशी स्टेशनजवळ रिक्षा चालकांनी आज बंद पुकारला आहे. स्टँडवर होणारी अवैध पार्किंग, स्टँडवर जागा वाढवून भेटणे याही यात मुख्य मागण्या आहेत. वाहतूक पोलिसांनी ठोस आश्वासन दिल्याशीवाय संप सुरूच ठेवणार असल्याचाही पवित्रा त्यांनी घेतला आहे. अचानक पुकारलेल्या बंदमुळे चाकरमान्यांचे मोठे हाल झाले आहेत.