प्रवाशांची चिंता वाढणार, राज्यभरातील रिक्षाचालक उद्या रात्रीपासून संपावर

8 जुलैच्या मध्यरात्रीपासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय रिक्षा चालक-मालकांच्या संघटनेनं घेतला आहे. भाडेवाढीच्या मुख्य मागणीसह राज्यातले 20 लाख रिक्षा चालक-मालक संपावर जाणार आहेत.

News18 Lokmat | Updated On: Jul 7, 2019 05:41 PM IST

प्रवाशांची चिंता वाढणार, राज्यभरातील रिक्षाचालक उद्या रात्रीपासून संपावर

मुंबई, 07 जुलै : ही बातमी मुंबईकरांच्या प्रवासाची चिंता वाढवणारी आहे. कारण, 8 जुलैच्या मध्यरात्रीपासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय रिक्षा चालक-मालकांच्या संघटनेनं घेतला आहे. भाडेवाढीच्या मुख्य मागणीसह राज्यातले 20 लाख रिक्षा चालक-मालक संपावर जाणार आहेत. साहजिकच मुंबई उपनगरांतील रहिवाशांसह राज्यभरात रिक्षावर अवलंबून असणाऱ्या नागरीकांचे खूप हाल होणार आहेत.

ऑटो रिक्षा चालक-मालक संघटना कृती समिती महाराष्ट्र या संघटनेनं याआधी परिवहन मत्र्यांना आपल्या मागण्या पत्राद्वारे कळवल्या आहेत. त्यासंबंधी याआधीही अनेक बैठका घेण्यात आल्या. पण त्यावर सरकारकडून कोणतंही पाऊल उचललं गेलं नाही. त्यामुळे थेट संपाचा निर्णय घेण्यात आला आहे. या मागण्या मंजूर झाल्या नाहीत तर 9 जुलैपासून संपावर जाण्याचा निर्णय घेतला रिक्षा चालकांकडून घेण्यात आला आहे.

या आहेत रिक्षाचालक मालकांच्या मागण्या...

- हकीम समितीच्या शिफारसीनुसार भाडेवाढ

- ओला-उबर सेवा बंद करा

Loading...

- मुक्त परवाने देणं बंद करा

- रिक्षाचालकांना पेंशन, आरोग्यविमा द्या

- चालकांना भविष्यनिर्वाह निधी मिळावा

- रिक्षाच्या विम्याची रक्कम अर्ध्यानं कमी करा

- अवैध वाहतुक रोखण्यासाठी भरारी पथकं नेमावी

या मुद्द्यावर न्यूज18 लोकमतचे काही सवाल...

- रिक्षा चालकांच्या मुजोरीला चाप बसणार का?

- भाडी नाकारली जाणार नाहीत याची हमी कोण घेणार?

- रिक्षा चालक सर्व नियमांचं पालन करणार का?

- सदोष सेवेच्या बदल्यात प्रवाशांनी भाडेवाढ का सोसावी?

- रिक्षाची व्यवस्थित देखभाल चालक-मालक करणार का?

VIDEO : मुख्यमंत्री कुणाचा असणार? दानवेंनी केला दावा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 7, 2019 05:41 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...