ऋषभ पंतला भेटताच ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान म्हणाले, ‘तो तू आहेस जो स्लेजिंग करतो...’

ऋषभ पंतला भेटताच ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान म्हणाले, ‘तो तू आहेस जो स्लेजिंग करतो...’

भारतीय संघात स्लेजिंगमध्ये युवा खेळाडू ऋषभ पंत आघाडीवर आहे. त्याने गेल्या सामन्यात टिम पेनला स्लेजिंग केली होती. हे प्रकरण चांगलंच चर्चेत होतं.

  • Share this:

सिडनी, ०३ जानेवारी २०१९- सध्या भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. दोन्ही संघात चार सामन्यांची एक कसोटी मालिका खेळण्यात येत आहे. या सामन्यात खेळाडू भरपूरप्रमाणात स्लेजिंग करताना दिसत आहेत. भारतीय संघात स्लेजिंगमध्ये युवा खेळाडू ऋषभ पंत आघाडीवर आहे. त्याने गेल्या सामन्यात टिम पेनला स्लेजिंग केली होती. हे प्रकरण चांगलंच चर्चेत होतं.

तिसऱ्या कसोटीनंतर ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी दोन्ही संघाला त्यांच्या घरी आमंत्रित केलं होतं. या दरम्यान ऋषभ जेव्हा स्कॉट यांच्या समोर आला तेव्हा स्कॉट यांनी लगेच त्याला ओळखले आणि ते म्हणाले की, ‘तो तू आहेस जो स्लेजिंग करतो.’

दोन्ही संघाचे स्लेजिंग फक्त मैदानापर्यंतच अवलंबून आहे. याचं ताज उदाहरण म्हणजे ऋषभचा फोटो. या फोटोत तो पेनच्या मुलांसोबत खेळताना दिसत आहे. तिसऱ्या कसोटी सामन्यानंतर दोन्ही संघाचे सर्व खेळाडू पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांच्या घरी आमंत्रणानंतर खानपानाला गेले होते.

दरम्यान, जगातील पहिल्या नंबरची कसोटी टीम म्हणून ओळख असलेला भारतीय संघ गुरुवारपासून सुरू झालेल्या सिडनी क्रिकेट ग्राउंडवर ऑस्ट्रेलियासोबत चौथा आणि शेवटचा कसोटी सामना खेळत आहे. हा सामना जिंकून ७० वर्षांत पहिल्यांदा कसोटी मालिका आपल्या नावावर करण्याची संधी भारतीय संघाकडे आहे. चार सामन्यांच्या या मालिकेत भारताकडे २- १ अशी आघाडी असून चौथ्या सामन्यात भारताचे पारडे जड आहे. भारताने हा सामना अनिर्णित जरी ठेवला तरी भारत ही मालिका २- १ ने जिंकेल. ही ऑस्ट्रेलियाच्या जमिनीवर जिंकलेली पहिली मालिका असेल.

भारतीय संघ- लोकेश राहुल, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह

ऑस्ट्रेलियाचा संघ- मार्कस हॅरिस, उस्मान ख्वाजा, मारनस लैबुशांगे, शॉन मार्श, पीटर हँड्सकॉम्ब, ट्रॅविस हेड, टिम पेन (कर्णधार आणि यष्टीरक्षक), पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, नाथन लायन, जोश हेजलवुड

First published: January 3, 2019, 10:49 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading