लंडन, 21 ऑगस्ट : अॅशेस मालिकेतील तिसरा कसोटी सामना गुरुवारपासून सुरू होणार आहे. दोन सामने झाले असून ऑस्ट्रेलियानं 1-0 ने आघाडी घेतली आहे. दरम्यान, दोन्ही देशांसाठी ही मालिका प्रतिष्ठेची असल्यानं कोणत्याही परिस्थितीत विजय मिळवूच अशा इराद्याने खेळाडू मैदानावर उतरतात. दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडच्या जोफ्रा आर्चरनं बाऊन्सरचा मारा करून इंग्लंडच्या फलंदाजांना जखमी केले. यात स्टीव्ह स्मिथ तर तिसऱ्या सामन्याला मुकला आहे. त्यामुळं आता ऑस्ट्रेलियासुद्धा तिसऱ्या सामन्यात बाऊन्सरने उत्तर देणार अशी चर्चा होत आहे. मात्र, ऑस्ट्रेलियाचे प्रशिक्षक जस्टीन लँगर यांनी आम्हाला बाऊन्सरचं युद्ध खेळायचं नाही असं म्हटलं आहे.
जस्टीन लॅंगर म्हणाले की, आमचा संघ 18 वर्षांनी इंग्लंडमध्ये अॅशेस जिंकण्याच्या इराद्यानं आला आहे. बाऊन्सरचं युद्ध खेळायला आलेलो नाही. त्यांनी कितीही हल्ला केला तरी आम्ही आमच्या ध्येयापासून परावृत्त होणार नाही. आम्ही जिंकायला आलो आहे. कसोटी मालिका जिंकायची आहे. दुखापत करण्याचा सामना नसून असे सामने जिंकता येत नाहीत असंही लँगर म्हणाले.
दुसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथ जोफ्रा आर्चरच्या बाऊन्सरमुळे मैदानावरच कोसळला. त्यानंतर रिटायर्ड हर्ट होऊन स्मिथला मैदान सोडावं लागलं. तिसऱ्या सामन्यात स्मिथ खेळू शकणार नाही याचा फटका ऑस्ट्रेलियाला होऊ शकतो. स्मिथने अॅशेसमध्ये पहिल्या कसोटीत 144 आणि 142 धावा केल्या. त्यानंतर दुसऱ्या कसोटीतही त्यानं 92 धावांची खेळी केली.
वाचा : सानियानं शेअर केला फोटो; युजर्सनी विचारलं, हा कसला ड्रेस घातलास?
इंग्लंडकडून केल्या जाणाऱ्या बाऊन्सरला जशास तसं उत्तर द्यायला आम्हालाही येतं. त्यांच्या फलंदाजांना बाऊन्सरने जखमी करण्यापेक्षा ती ताकद त्यांना बाद करण्यात लावू असं ऑस्ट्रेलियाचे प्रशिक्षक लँगर यांनी म्हटलं आहे. सध्या इंग्लंडच्या संघात जेम्स अँडरसनचं पुनरागमन झालेलं नाही त्यामुळे त्याचा दणका इंग्लंडला बसू शकतो. दुसरीकडं ऑस्ट्रेलियाकडं पेंट कमिन्स, जोश हेजलवूड आणि मिशेल स्टार्क हे वेगवान गोलंदाज आहेत.
कपडे काढून दाखवू का? पुण्यात दारूड्या महिलेची पोलिसांनाच शिवीगाळ पाहा हा VIDEO
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा