दिलासादायक, तब्बल 122 दिवसानंतर 'या' हॉटस्पॉट शहरात एकही कोरोना रुग्ण सापडला नाही!

दिलासादायक, तब्बल 122 दिवसानंतर 'या' हॉटस्पॉट शहरात एकही कोरोना रुग्ण सापडला नाही!

काही महिन्यांपूर्वी कोरोनाचा हॉटस्पॉट असलेल्या एका देशात तब्बल 4 महिन्यांनी एकही रुग्ण सापडला नाही आहे.

  • Share this:

सिडनी, 26 ऑक्टोबर : जगभरात काही देशांमध्ये कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर, काही देशांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या कमी होताना दिसत आहे. भारतातही कोरोना रुग्णांची संख्या कमी झालेली पाहायला मिळाली. मात्र काही महिन्यांपूर्वी कोरोनाचा हॉटस्पॉट असलेल्या एका देशात तब्बल 4 महिन्यांनी एकही रुग्ण सापडला नाही आहे. हा देश आहे ऑस्ट्रेलिया. ऑस्ट्रेलियातील विक्टोरिया परिसरात एकही नवीन रुग्ण सापडला नाही.

ऑस्ट्रेलियाच्या विक्टोरिया स्टेटनं दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांत एकही नवीन कोरोना रुग्ण सापडला नाही. 122 दिवसांनी पहिल्यांदा असा प्रकार घडला आहे. त्यामुळे देश लवकरच कोरोनावर मात करेल, असे मत पंतप्रधान बोरी जॉन्सन यांनी व्यक्त केले आहे.

देशातील मेलबर्न आणि सिडनी भागात अजूनही लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. मेलबर्न कोरोनाचा मोठा हॉटस्पॉट होता. इथं 15 हजारहून अधिक कोरोना रुग्ण आहेत. मेलबर्नमध्ये जुलैपासून लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. यानंतर रोज कोरोनोबाधितांची संख्या वाढत होती. मात्र यावेळी पहिल्यांदा 24 तासांत एकाही रुग्णाची नोंद झाली नाही.

वाचा-पॉझिटिव्ह बातमी ! कोरोना आला आणि ‘हा’ जीवघेणा आजार कमी झाला

ऑस्ट्रेलियात आतापर्यंत 27 हजार 500 कोरोना रुग्ण आहे. इतर प्रगत देशांपेक्षा ही संख्या खूप कमी आहे. विक्टोरिया परिसरात एकूण मृतांपेक्षा 90 टक्के रुग्णांचा मृत्यू झाला होता. मात्र 24 तासांत एकही रुग्ण न सापडल्यानंतर ही बाब दिलासा देणारी आहे.

फ्लूच्या रुग्णांमध्ये घट

जागतिक आरोग्य संघटनेच्या सर्विलांस डेटामधून ही माहिती समोर आली आहे की, फ्लूच्या रुग्णांमध्ये गेल्या वर्षी पेक्षा 98 टक्के घट झाली आहे. उदाहरणच द्याचं झालं तर, 2020 च्या एप्रिलमध्ये ऑस्ट्रेलियामध्ये फक्त 14 फ्लूच्या केसेस समोर आल्या होत्या.

वाचा-कोरोनानं लेदर बॉलप्रमाणे रुग्णाच्या फुफ्फुसांची अवस्था, पाहा X-ray रिपोर्ट

गेल्या वर्षी हीच संख्या 367 होती. WHOच्या रिपोर्टनुसार एन्फ्लूएंजा व्हायरस म्हणजे फ्लू हा साधा वाटणारा रोग आहे. पण या रोगामुळे दर वर्षाला जगभरात 5 लाख लोकांना आपला जीव गमवावा लागतो. लिव्हरपूल विद्यापीठातील व्हायरस तज्ज्ञ प्राध्यापक जेम्स स्टीवार्ट यांनी सांगितलं की, आपली प्रतिकारशक्ती संक्रमण झाल्यानंतर सक्रीय होते. त्यानंतर व्हायरसला नष्ट करते. या दरम्यान जर शरीरात इतर कोणत्याही व्हायरसचा प्रवेश झाल तर कोरोनाच्या संक्रमणाने विकसित झालेल्या प्रतिकारशक्तीमुळे फ्लू या आजाराचा व्हायरस जास्त वेळ टिकू शकत नाही.

Published by: Priyanka Gawde
First published: October 26, 2020, 8:38 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading