औरंगाबादमध्ये ज्याची भीती होती तेच झालं, कोरोनाची धक्कादायक आकडेवारी समोर

औरंगाबादमध्ये ज्याची भीती होती तेच झालं, कोरोनाची धक्कादायक आकडेवारी समोर

मुंबई आणि पुण्यात आतापर्यंत कोरोनाबाधित सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहे. परंतु, आता या दोन्ही शहरापाठोपाठ औरंगाबादमध्येही कोरोनाचा उद्रेक झाला आहे.

  • Share this:

औरंगाबाद, 18 मे : महाराष्ट्रात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. मुंबई आणि पुण्यात आतापर्यंत कोरोनाबाधित सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहे. परंतु, आता या दोन्ही शहरापाठोपाठ औरंगाबादमध्येही कोरोनाचा उद्रेक झाला आहे. शहरात रुग्णांची संख्या 1021 वर पोहोचली आहे.

औरंगाबाद शहरात मार्च आणि एप्रिल महिन्याच्या मध्यापर्यंत कोरोनाबाधितांची आकडेवारी आटोक्यात होती. पण, अचानक एप्रिल महिन्याच्या अखेरीस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या इतका झपाट्याने वाढली की, प्रशासनही हादरून गेलं. जवळपास गेल्या 25 दिवसात शहरात कोरोबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली.

हेही वाचा -जगातल्या या देशांमध्ये कोरोनाचा दुसरा उद्रेक होणार, शास्त्रज्ञांचा इशारा

आज शहरात 59 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आहे. त्यामुळे शहरात कोरोनाबाधितांची एकूण संख्या 1021 वर पोहोचली आहे.  शहरातील पैठण गेट, सब्जी मंडी (1), किराडपुरा (1), सेव्हन हिल कॉलनी (1), एन-6 सिडको (1), बायजीपुरा (1), रोशन नगर (1), न्याय नगर (3), बहादूरपुरा, बंजारा कॉलनी, गल्ली नं.2 (4), हुसेन कॉलनी (4), पुंडलिक नगर (2), हनुमान नगर (1), संजय नगर, गल्ली नं. पाच (1), हिमायत बाग, एन-13 ‍सिडको (1), मदनी चौक (2), सादाफ कॉलनी (1), सिल्क मील कॉलनी (8), मकसूद कॉलनी (6), जुना मोंढा (11), भवानी नगर (5), हिमायत बाग, जलाल कॉलनी (3), बेगमपुरा (1) या भागात कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये 27 महिला व 32 पुरुषांचा समावेश आहे.

 मृतांचा आकडा 31 वर

दरम्यान, रविवारी 17 मे रोजी अवघ्या 14 तासात तीन कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. आतापर्यंत घाटी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या 28, मिनी घाटीमध्ये एक आणि खासगी रुग्णालयात दोन अशा एकूण 31 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. सध्या घाटीत 70 कोरोनाबाधित उपचार घेत आहेत. ज्यामध्ये 64 रुग्णांची स्थिती सामान्य, सहा रुग्णांची स्थिती गंभीर आहे.

आतापर्यंत 312 जणांची कोरोनावर मात

एकीकडे शहरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. तर दुसरीकडे  कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांची संख्याही लक्षणीय आहे. 17 मेपर्यंत 312 रुग्ण बरे होऊन घरी परतल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

हेही वाचा -बापरे! वाऱ्यामुळे रस्त्यावर पार्क केलेली बस मागे-मागे सरकली, तुम्हीच पाहा VIDEO

महानगरपालिकेच्या कोविड केअर सेंटर, जिल्हा सामान्य रुग्णालय (मिनी घाटी) आणि शासकीय वैद्यकीय रुग्णालय व महाविद्यालय (घाटी) या ‍ठिकाणी कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत. या यंत्रणेतील डॉक्टर्स, परिचारिका, ब्रदर्स, आरोग्य कर्मचारी, सेवक आदी कोरोना वॉरिअर्सच्या अथक परिश्रमातून व यशस्वी उपचारानंतर आजपर्यंत एकूण 312 रुग्ण बरे होऊन घरी परतलेले आहेत.

महापालिकेच्या कोविड केअर सेंटरमधून आतापर्यंत सर्वात अधिक म्हणजे 180 रुग्ण बरे होऊन घरी परतलेले आहेत. तर जिल्हा सामान्य रुग्णालयातून 112 रुग्ण बरे झालेले आहेत. तसंच घाटीतून 20 रुग्ण बरे झालेले आहेत.

संपादन - सचिन साळवे

First published: May 18, 2020, 9:54 AM IST

ताज्या बातम्या