औरंगाबाद, 31 जुलै: शहरातील चिकलठाणा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नाथनगर (वडखा, ता. औरंगाबाद) येथे मन सुन्न करणारी घटना घडली आहेय नाथनगर येथील पाझर तलावात पोहोण्यासाठी गेलेल्या 6 जणांपैकी 5 तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. मृतामध्ये 3 सख्ख्या भावांचा समावेश आहे. या घटनेनं संपूर्ण शहरावर शोककळा पसरली आहे.
घटनेची माहिती मिळताच चिकलठाणा पोलीस घटनास्थळी पोहोचले आहे. आतापर्यंत दोन तरुणांचे मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आले असून इतर तिघांचा शोध सुरू आहे.
हेही वाचा....लॉकडाऊनचा बळी! उपासमारीची वेळ आलेल्या ST कर्मचाऱ्यानं पत्नीच्या साडीनं लावला गळफास
समीर मुबारक शेख (वय-17 वर्षे), शेख अन्सार शेख सत्तार (17 वर्षे), तालिब युसूफ शेख (21 वर्षे), अतिफ युसूफ शेख (17 वर्षे) आणि सोहेल युसूफ शेख (16 वर्षे) अशी मृतांची नावं आहे. सर्व मृत तरुण मौजे भालगाव येथील रहिवासी आहेत. यात एकाच कुटुंबातील तीन भावंडाचा समावेश आहे. बकरी ईदच्या पूर्वसंध्येला ही दुर्दैवी घटना घडल्यामुळे शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
गोबी काढण्याच्या निमित्तनं गेले होते तरुण...
मौजे भालगाव येथील 9 शेतमजूर गोबी काढण्याच्या निमित्तनं नाथनगर येथे गेले होते. मात्र, 9 पैकी 5 तरुण येथील पाझर तलावात पोहोण्यासाठी उतरले. त्यांना पाण्याच्या पातळीचा अंदाज न आल्यानं सगळ्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.
हेही वाचा...पावसात भाषण केल्यानं हमखास यश मिळतं, रावसाहेब दानवेंची शरद पवारांना कोपरखळी
घटनास्थळी पोलीस कर्मचारी आणि अग्निशमन दलाचे जवान पोहोचले आहेत. आतापर्यंत दोन जणांचे मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आले आहेत. उर्वरित तिघांचा शोध घेण्याचं काम सुरू आहे.