Home /News /news /

औरंगाबाद मर्डर मिस्ट्री; रात्री घरात झाली प्रोफेसरची हत्या; पत्नीला मात्र सकाळी 7 वाजता आली जाग

औरंगाबाद मर्डर मिस्ट्री; रात्री घरात झाली प्रोफेसरची हत्या; पत्नीला मात्र सकाळी 7 वाजता आली जाग

औरंगाबादमध्ये झालेला हा प्रकार मन हेलावून टाकणारा आहे. रात्रभर प्राध्यापकाचा रक्ताळलेला मृतदेह घराच्या हॉलमध्ये पडून होता.

    औरंगाबाद, 13 ऑक्टोबर : औरंगाबादमध्ये (Aurangabad Crime News) सध्या एका प्राध्यापकाची हत्या मोठं रहस्य ठरलं आहे. या प्राध्यापकाची त्याच्या राहत्या घरात हत्या करण्यात आली. मात्र प्राध्यापकाच्या हत्येनंतर (Professor murder news) कुटुंबीयांच्या हालचालीवर संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे ही हत्या पोलिसांसमोर मोठं आव्हान (Aurangabad Murder Mystery) ठरलं आहे. काय आहे प्रकरण? प्रा. राजन शिंदे चळवळीतून पुढे आलेलं नेतृत्व आहे. शिक्षण क्षेत्रात त्यांची ओळख होती. औरंगाबाद येथील मौलाना आझाद महाविद्यालयात इंग्रजी विभागाचे प्रमुख. कुणाच्या ध्यानीमनी नसतांना त्यांची त्यांच्याच घरात क्रूरपणे हत्या करण्यात आली. विशेष म्हणजे कुटुंबातील मुलगा, मुलगी, पत्नी आणि आई-वडील घरात असतांना त्यांची क्रूर हत्या करण्यात आली. असे असतांना घरातील सदस्यांना पहाटेपर्यंत हत्या झाल्याचे कसे समजले नाही हे गूढ आहे. प्रा राजन शिंदे यांचा गळा चिरण्यात आला. त्यांच्या दोन्ही हाताच्या नस कापण्यात आल्या आणि त्यांच्या डोक्यावर हातोडीने प्रहार करण्यात आले. त्यामुळे त्यांचा मृत्यू जागेवरच झाला. (Aurangabad Murder Mystery The murder of a professor took place at home at night The wife woke up at 7 in the morning) राजन शिंदे यांची हत्या मध्यरात्री करण्यात आली. घराच्या हॉलमध्ये एकटे झोपले असतांना त्यांची हत्या करण्यात आली. त्यांच्या अल्पवयीन मुलाने सर्वप्रथम 5 वाजता त्यांना हॉलमध्ये मृत अवस्थेत पाहिले. त्याने घरातील कुणालाही न उठवता चारचाकी काढून बाहेर पडला. त्यानंतर त्याने चारचाकी गल्लीतील एका वाहनाला ठोकली आणि चारचाकी चालू अवस्थेत ठेऊन तिथून निघून गेला. रुग्णवाहिका घेऊन घरी आला. मात्र रुग्णवाहिका चालकाने पोलिसात तक्रार दिल्याशिवाय हात लावणार नाही असे सांगितले. त्यानंतर मुलाने बहिणीला उठवले. बहीण भाऊ यांनी 6 वाजता पोलीस चौकीत जाऊन माहिती दिली आणि 7 वाजता पोलीस आल्यानंतर प्रा शिंदे यांची पत्नी बाहेर आली आणि घटना सार्वजनिक झाली. या घटनेत विशेष बाब प्रा शिंदे यांच्या मुलाने रात्रीच आपल्या मोबाईल वर हत्या कशी करावी याबद्दलची माहिती विविध वेब साईट वर रात्री उशिरा पर्यंत बघितली होती. त्यामुळे घरातील सदस्यांवरील संशय वाढला आहे. हे ही वाचा-रात्री कुटुंबीयांसोबत शेवटचं जेवला अन् सकाळी आढळला मृत; मनाला चटका लावणारी घटना या घटनेनंतर अनेक प्रश्न उद्भवले आहेत... काही प्रश्न मुलाने घटना समजल्या नंतर कुटुंबीयांना का नाही उठवले मुलगा आणि मुलीने सर्वप्रथम पोलिसांना का नाही कळवले वेब साईटवर मुलाने हत्या कशी करावी हे का बघितले सीसीटीव्हीमध्ये घरात कुणीही गेले नसल्याचे पुरावे पोलिसांकडे उपलब्ध प्रा शिंदे यांची हत्या झाल्यानंतर घटनास्थळी सांडलेलं रक्त कुणी पुसले CCTV मध्ये कोणीही घरात गेल्याचे पुरावे नाही प्राध्यापक राजन शिंदे प्राध्यापकांची चळवळ चालवणारे होते. त्यांचे कुणाशीही वैर नव्हते. त्यांच्या पत्नी सुद्धा प्राध्यापक आहेत. मुलगा बारावीनंतर कायद्याचे शिक्षण घेत आहे तर मुलगी उच्च महाविद्यालयीन शिक्षण घेत आहे. प्रा शिंदे यांची हत्या झाली त्यारात्री त्यांच्या घरात कुणीही गेले नाही किंवा बाहेरही पडलेलं नाही. मग एवढी क्रूर हत्या कुणी केली हा मोठा सवाल आहे.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Aurangabad, Crime news, Murder

    पुढील बातम्या