औरंगाबादमध्ये विद्यार्थ्यांना ओलांडावा लागतो ‘मृत्यू’चा ट्रॅक

औरंगाबादमध्ये विद्यार्थ्यांना ओलांडावा लागतो ‘मृत्यू’चा ट्रॅक

मुकूंदनगरच्या विद्यार्थ्यांना रेल्वे ट्रॅक ओलांडून शाळेत जावं लागत आहे. सराकारने वेळीच लक्षं दिले नाही तर हा मृत्यूचा ट्रॅक ठरण्याची शक्यता आहे.

  • Share this:

औरंगाबाद,ता.17 जुलै : राज्यातील ग्रामीण भागात विद्यार्थी अनेक समस्यांवर मात करून शिक्षण घेतात. कुठे नदीवर पूल नाही तर कुठे रस्त्यावर पूल नाही अश्या ठिकाणी जीव धोक्यात घालून विद्यार्थी जा ये करतात. शहरातील विद्यार्थी थोडे नशीबवान असतात. कारण त्यांना या समस्या सहसा येत नाहीत. मात्र पर्यटनाची राजधानी असलेल्या औरंगाबाद शहरात शाळकरी मुलांना धोकादायक रेल्वे ट्रॅक ओलांडून शाळेत जावं लागत आहे. सराकारने वेळीच लक्षं दिले नाही तर हा मृत्यूचा ट्रॅक ठरण्याची शक्यता आहे. औरंगाबाद शहरातील मुकुंदवाडी रेल्वे स्थानकावर दररोज शाळकरी मुलांची लगबग असते. ही लगबग शाळेत जाण्यासाठी रेल्वे पकडण्यासाठी नाही तर रेल्वे ट्रॅक ओलांडून शाळेत जाण्यासाठी असते. या मुलांच्या शाळेची वेळ दुपारी 12 ची आहे. आणि नेमक्या याच वेळेत अनेक रेल्वे गाड्या सुसाट जातात. गेल्या 10 ते 15 वर्षांपासून रेल्वे पुलाची मागणी झालीय मात्र याकडे ना रेल्वे खाते लक्ष देत नाही की स्थानिक प्रशासन त्यामुळे लोकांमध्ये प्रचंड नाराजी आहे.

सिंचन घोटाळ्याप्रकरणी आणखीन दोघांवर गुन्हे दाखल!

राज्यसभेच्या उपसभापतीपदासाठी राष्ट्रवादीच्या वंदना चव्हाणांचं नाव आघाडीवर

याचा फटका फक्त विद्यार्थ्यांनाच नाही तर महिला आणि वद्धांनाही त्रास सहन करावा लागतोय. मुकुंदवाडी परिसरातून औरंगाबाद शहरात येण्यासाठी रेल्वे ट्रक ओलांडल्या शिवाय दुसरा पर्याय नागरिकांकडे नाही. मुकुंदवाडी परिसरातून जवळपास 2 ते अडीच हजार विद्यार्थी शाळेत जातात. प्रत्येक विद्यार्थ्याला हाताला धरूनकिंवा उचलून त्याच्या आई वडिलांना रेल्वे ट्रॅक ओलांडून द्यावा लागतो

मागणी करूनही मुकुंदवाडी येथे रेल्वेट्रक वर पूल बांधला जात नाही..मोठ्या दुर्घटनेची वाट रेल्वे प्रशासन आणि स्थानिक प्रशासन पाहत आहे का असा सवाल मुकुंडवाडीचे नागरिक विचारात आहेत.

 

दूध प्रश्नावर तोडगा नाही, आंदोलन सुरूच राहणार

VIDEO : संभाजी भिडेंचा आंबेडकरांबद्दलचा दावा हरी नरकेंनी खोडला

 

 

First published: July 17, 2018, 8:15 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading