एसटी बस आणि जीपची जोरदार धडक, 4 जणांचा जागीच मृत्यू

एसटी बस आणि जीपची जोरदार धडक, 4 जणांचा जागीच मृत्यू

आंबेजोगाई- केज-मांजरसुंबा रस्त्यावर भीषण अपघात, 15 जण जखमी.

  • Share this:

सुरेश जाधव (प्रतिनिधी)बीड, 24 डिसेंबर: आंबेजोगाई- केज-मांजरसुंबा रस्त्यावर भीषण अपघात झाला आहे. औरंगाबाद -मुखेड एसटीला केज तालुक्यात चंदनसावरगाव जवळ अपघात झाला आहे. या भीषण अपघातात 4 जणांचा जागीच मृत्यू झाला असल्याची माहिती मिळत आहे. औरंगाबाद इथे एसटी बस आणि जीपची धडक झाली आणि हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

औरंगाबाद -मुखेड एसटी आणि कोंबड्यांना घेऊन जाणाऱ्या जीपचा चंदनसावर गावाजवळ भीषण अपघात झाला. मंगळवारी दुपारी हा अपघात झाला. स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना बाहेर काढलं असून सध्या उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं आहे. या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला असून 15 जण जखमी आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 24, 2019 03:07 PM IST

ताज्या बातम्या