औरंगाबादच्या 508 महिला बेपत्ता, तस्करांच्या तावडीतून सुटलेल्या तरुणीने केला धक्कादायक खुलासा

औरंगाबादच्या 508 महिला बेपत्ता, तस्करांच्या तावडीतून सुटलेल्या तरुणीने केला धक्कादायक खुलासा

औरंगाबाद जवाहर नगर येथील एका तरुणीने गुजरात मधून आपली सुटका करून घेतली आणि धक्कादाक खुलासा झाला.

  • Share this:

औरंगाबाद 12 फेब्रुवारी :  शहर आणि शहरालगत असलेल्या वाळूज चिकलठाणा औद्योगिक वसाहती मधून अनेक महिला बेपत्ता झालेल्या आहेत. बेपत्ता महिलांमध्ये विवाहित आणि अविवाहित दोघींचे प्रमाण आहे. गेल्या सहा वर्षात शहरातून जवळपास 508 महिला बेपत्ता असल्याच्या तक्रारी नातेवाईकांनी केल्या आहेत. तक्रारी वरून पोलिसांनी महिलांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांना या महिलांचा शोध घेण्यात अपयश आलंय. औरंगाबाद जवाहर नगर येथील एका महिलेने गुजरात मधून आपली सुटका करून औरंगाबादला आली आणि तिने पोलिसात तक्रार केली. या महिलेच्या तक्रारी नुसार तिला काम लावतो अशी थाप मारून तिला गुजरात राज्यात नेण्यात आले आणि तिची विक्री दीड लाखात करण्यात आली.

नंतर दोन महिन्या नंतर तिची विक्री पुन्हा दुसऱ्या व्यक्तीला एक लाखात करण्यात आली. त्या नंतर ही महिला आपली सुटका करून घेण्यात यशस्वी ठरली आणि ती औरंगाबाद ला पोहचली. तिच्या तक्रारी वरून गुजरातच्या निलेश पटेल याला औरंगाबाद पोलिसांनी ताब्यात घेतले.  भारतातील काही राज्यामध्ये मुलींचा जन्म दर कमी आहे त्यामुळे त्या राज्यात लग्नासाठी मुली महिला मिळत नाहीत अशा राज्यात मागणी जास्त आहे.

मंत्र्यांच्या बंगल्यांवर 15 कोटींची उधळपट्टी, कुठल्या नेत्यांसाठ किती रुपये?

औरंगाबादेतून गुजरात आणि राजस्थान या राज्यात अनेक मुली आणि महिलांना विकल्याचे धागेदोरे औरंगाबाद पोलीस समोर आले आहेत. औरंगाबाद सहाय्यक पोलीस आयुक्त नागनाथ कोडे यांनी दिलेल्या माहिती नुसार महिलेच्या बेपत्ता झाल्याची तक्रात आल्या नुसार पोलीस तपास करतात. अनेक वेळी काही महिला मुली स्वतः घर सोडून जातात त्यांचा तपास पोलीस लावतात मात्र त्या परत यायला तयार नसतात. तर काही महिला देह विक्रीच्या व्यवसायात अडकून बसतात..बदनामी होईल म्हणून त्या समोर येतच नाहीत.

मुंबई 23 बांगलादेशींना अटक, 'मनसे'च्या मोर्चानंतर पोलिसांची धडक कारवाई

औरंगाबाद मधून 2014 साली 513 महिला बेपत्ता झाल्या मात्र 40 महिलांचा शोध लागलेला नाही.

2015 साली 618 महिला बेपत्ता झाल्या 55 महिला सापडल्या नाहीत

2016 साली 490 महिला बेपत्ता झाल्या मात्र 55 महिला सापडल्या नाहीत

2017 साली 425 महिला बेपत्ता झाल्या 62 महिला सापडल्या नाहीत

2018 साली 555 महिला बेपत्ता झाल्या 80 महिला सापडल्या नाहीत

2019 साली 615 महिला बेपत्ता झाल्या मात्र 125 महिला शोधण्यात अपयश आले.

सोन्याच्या अंगठ्या चोरताना अभिनेत्रीला अटक, पुण्यातल्या मॉलमधली घटना

औरंगाबाद शहरातून ज्या 508 महिला अजूनही बेपत्ता आहेत त्या सर्व 18 वर्षावरील आहेत. त्यांचा शोध औरंगाबाद पोलीस घेत आहेत. या पैकी किती महिलांची विक्री परराज्यात झाली याचा आकडा पोलिसांकडे नाही. मात्र ज्या निलेश पटेल या प्रकरणी अटकेत आहे त्याच्या कडून पालिसांना बरीच माहिती मिळेल अशी शक्यता आहे.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 12, 2020 04:38 PM IST

ताज्या बातम्या