VIDEO : अरे तो बुडतोय,पण काकासाहेबाला वाचावला कुणीच आलं नाही !

उद्या सरकार मराठा समाजाच्या आंदोलनापुढे नमलेही आणि आरक्षणाची मागणी मान्यही करेल...पण काकासाहेब शिंदेचा जीव परत येणार का ? हा प्रश्न मात्र अनुत्तरीतच राहणार आहे.

News18 Lokmat | Updated On: Jul 23, 2018 10:13 PM IST

VIDEO : अरे तो बुडतोय,पण काकासाहेबाला वाचावला कुणीच आलं नाही !

औरंगाबाद, 23 जुलै : एक मराठा लाख मराठा...,मराठा आरक्षण घेतल्याशिवाय राहणार नाही....फडणवीस सरकार हाय हाय...अशा घोषणा सुरू असताना अचानक पुलावरून काकासाहेब शिंदे याने नदीत उडी मारली...पोहता येत नसल्यामुळे काकासाहेब पाण्यात गटांगळ्या खात होता....कुणी मोबाईलमध्ये रेकाॅर्ड करत होतं...तर कुणी एक मराठा लाख मराठाच्या घोषणा देत होतं...पोलीसही कठड्यावरून पाहत होते...मध्येच कुणी तरी अरे तो बुडतोय...त्याला वाचावा...पण कुणीच पुढे आलं नाही...जे पुढे आलं त्यांना वाचवायला जाऊ दिलं नाही...आणि एक मराठा लाख मराठाच्या घोषणेत एका निष्पाप तरुणाचा जीव सर्वांच्या डोळ्या देखत गेला...

औरंगाबाद- अहमदनगर रोडवरील कायगाव इथं मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी आज  दुपारी जलसमाधी आंदोलन केलं होतं. कायगाव टोका येथील गोदावरी पात्रावरील पुलावर त्यांनी हे आंदोलन केलं. या आंदोलनादरम्यान काकासाहेब शिंदे नावाच्या तरुणाचा नदीत उडी मारून जीव दिला.  यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिकात्मक तिरडी गोदावरी नदीत अर्पण केली आहे. पण हे आंदोलन सुरू असताना काकासाहेब शिंदे नावाच्या तरूणाने नदीतच उडी घेतली.

मराठा आंदोलन : नदीत उडी घेतलेल्या आंदोलकाचा मृत्यू

आंदोलनासाठी जवळपास 50 ते 100 तरुण तिथे जमले होते आणि त्यांना आवरण्यासाठी पोलीस फौजफाटाही तिथे होता. काकासाहेब शिंदेना पोहता येत नसावे त्यामुळे नदीत उडी टाकल्यानंतर गटांगळ्या खाऊ लागला..त्याने हातपाय मारून जीव वाचवण्याचा प्रयत्न केला...पण गोदापात्र खोल असल्यामुळे त्याचे प्रयत्न अपुरे पडले...तो जिवाच्या आकांताने हातपाय मारत होता...पण त्याची झुंज अपयशी ठरली आणि काही क्षणात त्याने जीव सोडला...त्याचा मृतदेह पाण्यावर तरंगत होता...काही जण मोबाईलमध्ये त्यांचा मृत्यूचा प्रसंग कॅमेऱ्यात रेकाॅर्ड करत होतं...तर कुणी त्याला वाचवण्यासाठी आवाज देत होतं...पोलीस ही ढिम्मपणे कठड्यावरून पाहत होते..काही आंदोलक काकासाहेबला वाचवण्यासाठी पुढे आले...त्यांनी पोलिसांना वाचवण्यासाठी पुलावरून उडी मारू देण्याची विनंतीही केली...पण पुढे कुणाला जाता आलं नाही. अवघ्या काही मिनिटात काकासाहेब शिंदेने आपला जीव सोडला...

उद्या सरकार मराठा समाजाच्या आंदोलनापुढे नमलेही आणि आरक्षणाची मागणी मान्यही करेल..पण काकासाहेब शिंदेचा जीव परत येणार का ? हा प्रश्न मात्र अनुत्तरीतच राहणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 23, 2018 08:39 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...