Home /News /news /

'ऑक्टोबर अखेरीस दुष्काळ जाहीर करणार'

'ऑक्टोबर अखेरीस दुष्काळ जाहीर करणार'

लवकरच केंद्राची टीम पाहणी करण्यासाठी राज्यात दाखल होणार असल्याचे यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

    औरंगाबाद, 10 ऑक्टोबर : 31 ऑक्टोबरपर्यंत दुष्काळ जाहीर करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. औरंगाबाद येथे पार पडलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. लवकरच केंद्राची टीम पाहणी करण्यासाठी राज्यात दाखल होणार असल्याचे यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितले. दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी सरकारची पूर्ण तयारी झाली असल्याचा दावा करीत त्यांनी, ''दुष्काळ हा कुठल्या अधिकाऱ्याच्या मर्जीवर नव्हे, तर शास्त्रीय निकषांवर ठरतो'', असा टोलाही यावेळी लगावला. पावसानं पाठ फिरवल्यानं राज्यावर भीषण दुष्काळाची टांगती तलवार आहे. पावसाच्या कमतरतेमुळे पिकांचे नुकसान झाले आहे. आणेवारी मध्ये 1300 गाव बाधित झाले असून, 500 गावांत पाणीटंचाईने ग्रस्त असल्याची शक्यता त्यांनी यावेळी व्यक्त केली. दुष्काळ हा कुठल्या अधिकाऱ्याच्या मर्जीवर नव्हे, तर शास्त्रीय आधारावर ठरवला जातो. 31 ऑक्टोबर पर्यंत दुष्काळ जाहीर करू असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी लवकरच केंद्राची टीम येणार असून, राज्यातील दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यासाठी आमची तयारी झाली असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केलं. दुष्काळग्रस्त भागातील नागरिकांची तहान भागविण्यासाठी युद्ध् पातळीवर नियोजन करावे लागणार आहे. वेळेच्या आतच दुष्काळाचे निकष तपासले जातील असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. तसेच गरजू लोकांना घरं देण्याचे नियोजन सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. राज्यात अनेक ठिकाणी जलयुक्त शिवरची कामे समाधानकारक झाली असून, त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना त्यांची पीके वाचविण्यात यश आलं. 575 पाणी योजना मंजूर करत, यावर्षी 126 अणखी नवीन पाणी योजना मार्गी लावणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत 30 हजार किमी रस्ते तयार करण्यात येणार आहेत. औरंगाबाद शहरात 100 कोटींच्या रस्ते विषयीची योजना सुरू असून, औरंगाबाद शहरातील कचऱ्याची समस्या बऱ्यापैकी सुटली असली तरी, त्यावर अजून काम करण्याची आवश्यकता असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केलं. तसेच, स्मार्टसिटीचे कामही लवकरच सुरू होईल असं ते म्हणला. समांतर पाणी पुरवठा विषयी महापालिकेने अंतिम आराखडा तयार करावा आणि सुप्रीम कोर्टात सादर करावा. त्यासाठी राज्य शासन पूर्णतः मदत करायला तयार असल्याचं त्यांनी सांगितलं. गुन्हेगारीविश्र्वासंदर्भात बोलताना ते म्हणाले की, सामान्य नागरिकांचा मुद्देमाल त्यांना लगेच मिळावा यासाठी छोट्या गुन्ह्यांच्या बाबतीत पोलिसांनी अधिक तपास करायला हवा असे मुख्यमंत्री म्हणाले.  नवरात्रौत्सव : कराड बाजार समितीत गुळ सौद्यांना सुरूवात
    First published:

    Tags: 31 ऑक्टोबरपर्यंत, Aurangabad, By the end of October, CM, Devendra phadanvis, Drought, Maharashtra, Will be declared, औरंगाबाद, जाहीर करणार, दुष्काळ, देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

    पुढील बातम्या