तिकीट वाटपावरून राडा, इच्छुक उमेदवाराची संपर्क प्रमुखाला बेदम मारहाण

तिकीट वाटपावरून राडा, इच्छुक उमेदवाराची संपर्क प्रमुखाला बेदम मारहाण

औरंगाबाद फुलंब्री मतदार संघातून उमेदवारी देण्यासाठी प्रदेशाध्यक्ष सुरेश साखरे यांनी मुंबईत बोलावून 10 लाखांची मागणी केली होती.

  • Share this:

सिद्धार्थ गोदाम, प्रतिनिधी

औरंगाबाद, 03 ऑक्टोबर : औरंगाबादमध्ये तिकीट वाटपावरून इच्छुक उमेदवाराने बहुजन समाज पार्टीच्या संपर्क प्रमुखाला बेदम चोप दिल्याची घटना समोर आली आहे. मुकुंदवाडी परिसरात असलेल्या एका हॉटेलमध्ये ही घटना घडली असून या प्रकरणी मुकुंदवाडी पोलिसात तक्रार देण्यात आली आहे. पोलिसांकडून या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. औरंगाबाद मंडळाचे संपर्क प्रमुख म्हणून कार्यरत असलेल्या नामदेव खंदारे यांनी आणि प्रदेशाध्यक्षांनी फुलंब्री मतदार संघातून उमेदवारी देण्यासाठी 3 लाख रुपये घेतल्याचा आरोप शहराध्यक्ष गणेश निकाळजे यांनी केला आहे. इतकंच नाही तर माझ्यासह आणखी काही जणांकडून देखील पैसे घेतले असून त्यामधील काही लोकांनी खंदारे आणि त्यांच्या चालकाला चोप दिल्याचं गणेश निकाळजे यांनी सांगितलं.

औरंगाबाद फुलंब्री मतदार संघातून उमेदवारी देण्यासाठी प्रदेशाध्यक्ष सुरेश साखरे यांनी मुंबईत बोलावून 10 लाखांची मागणी केली होती. मात्र, इतके पैसे नसल्याचं सांगितल्यावर 6 लाख द्यायचं ठरलं. त्यानुसार पहिले तीन लाख रुपये दिले होते. त्यावेळी पुढील काम नामदेव खंदारे करतील अशी ठरलं होतं. मात्र, आता उमेदवारी दुसऱ्यालाच देत असल्याचा आरोप भारतीय समाजवादी पार्टीचे शहराध्यक्ष गणेश निकाळजे यांनी केला.

इतर बातम्या - कोट्यधीश आहेत सेनेचे युवराज; बॉन्ड शेअर्स, दागिने इतकी आहे मालमत्ता

दरम्यान, 'आज बी फॉर्म घेण्यासाठी फोन केला असता त्यांनी टाळाटाळ केली. मात्र, नंतर मुकुंदवाडी इथे A1 हॉटेलमध्ये ते राहत असल्याचं कळल्याने जाब विचारण्यासाठी गेलो होतो.' असं निकाळजे यांनी सांगितलं. माझ्या एकट्याकडून नाही तर फुलंब्री इथे राहणाऱ्या भगवान गंगावणे आणि चिखलठाणा येथील सत्यजित साळवे यांच्याकडून देखील उमेदवारी देण्यासाठी पैसे घेतले होते. त्यापैकी एकाने जाब विचारताना वाद झाला आणि त्याने हॉटेलच्या खोलीत दोघांना चोप दिल्याचं शहराध्यक्ष गणेश निकाळजे यांनी सांगितलं.

इतर बातम्या - नवरात्रात मोठ्या हल्ल्याची शक्यता, दिल्लीत घुसले 4 दहशतवादी; देशभरात हाय अलर्ट

याबाबत आपण कुठल्याच प्रकारचे पैसे घेतलेले नसल्याचा दावा संपर्क प्रमुख नामदेव खंदारे यांनी केला आहे. इच्छुक उमेदवारांना उमेदवारी न दिल्यानेच त्यांनी मारहाण केल्याचा खुलासा नामदेव खंदारे यांनी केला. त्यावर आता नेमकं काय प्रकरण आहे आणि मारहाण का करण्यात आली याचा पोलीस तपास करत आहेत.

इतर बातम्या - तुम्हाला नको तर आम्हाला द्या! भाजपने नाकारलेल्या उमेदवाराला NCPने दिलं तिकीट

First published: October 3, 2019, 2:36 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading