• Home
  • »
  • News
  • »
  • news
  • »
  • औरंगाबादेत एमपीएससी परीक्षार्थींचा सरकारविरोधात मोर्चा

औरंगाबादेत एमपीएससी परीक्षार्थींचा सरकारविरोधात मोर्चा

एमपीएससीच्या गलथान कारभाराविरोधात औरंगाबादेत आज जय भगवान संघाच्या वतीनं भव्य विद्यार्थी मोर्चा काढण्यात आला.

  • Share this:
06 फेब्रुवारी औरंगाबाद : औरंगाबादेत आज जय भगवान संघाच्या वतीनं भव्य विद्यार्थी मोर्चा काढण्यात आला.मोर्चाला मोठ्या प्रमाणात तरूण तरूणी विद्यार्थी सहभागी झाले होते. शिक्षकांची सगळीच रिक्त पदं भरावीत. एसपीएससी च्या सर्वच प्रतिक्षा यादी जाहिर करावी. सरकारी 30 टक्के नोकर कपातीचा निर्णय मागे घ्यावा. जिल्हा परिषदेची एकही शाळा बंद करू नये. नोकर भरती प्रकरणातील भ्रष्ट अधिकारी आणि लाभधारी यांच्यावर कडक कारवाई करावी अश्या प्रमुख मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला. शहरातील क्रांती चौक ते विभागीय कार्यालय असा हा विद्यार्थी मोर्चा काढण्यात आला. पुण्यातही एमपीएससी परीक्षार्थी अशाच पद्धतीचा मोर्चा काढताहेत.
First published: