खासदार खैरेंशी पंगा घेतल्यानेच रामदास कदमांनी औरंगाबादचे पालकमंत्रिपद गमावले ?

खासदार खैरेंशी पंगा घेतल्यानेच रामदास कदमांनी औरंगाबादचे पालकमंत्रिपद गमावले ?

शिवसेना खासदार चंद्रकांत खैरे यांच्याशी नामकरण वादावरून पंगा घेतल्यानेच रामदास कदम यांना औरंगाबादचं पालकमंत्रिपद गमवावं लागल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झालीय. रामदास कदम यांच्याकडे आता नांदेडच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी सोपवण्यात आलीय. शिवसेना पक्षप्रमुखांच्या सूचनेनुसारच आज राज्य सरकारने पालकमंत्री फेरबदलासंबंधीचे आदेश काढलेत.

  • Share this:

17 जानेवारी, औरंगाबाद : शिवसेना खासदार चंद्रकांत खैरे यांच्याशी नामकरण वादावरून पंगा घेतल्यानेच रामदास कदम यांना औरंगाबादचं पालकमंत्रिपद गमवावं लागल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झालीय. रामदास कदम यांच्याकडे आता नांदेडच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी सोपवण्यात आलीय. शिवसेना पक्षप्रमुखांच्या सूचनेनुसारच आज राज्य सरकारने पालकमंत्री फेरबदलासंबंधीचे आदेश काढलेत.

काय आहे औरंगाबादचा नामकरण वाद ?

शिवसेनेचे औरंगाबादचे खासदार चंद्रकांत खैरे यांनी अनेक वर्षांपासून सरकारकडे शहराच्या नामकरणाचा मुद्दा लावून धरलाय. पण याप्रकरणी शिवसेनेला श्रेय मिळू नये यासाठी भाजपकडून चालढकल केली जात असल्याचा आरोप खैरेंनी केला होता. त्यावर रामदास कदम यांनी चंद्रकांत खैरेंची बाजू लावून धरण्याऐवजी त्यांनाच उलट फटकारलं होतं. ‘खैरे खासदार आहेत. त्यामुळे राज्य सरकारने प्रस्ताव पाठवला आहे की नाही ते पाहावं. गरज पडली तर वेलमध्ये बसावं. पण साप-साप म्हणून भुई धोपटायचा प्रकार थांबवावा.’ अशी शेरेबाजी रामदास कदमांनी केली होती.

हा नामकरणाचा वाद कमी काय म्हणून, शहराच्या समांतर जलवाहिनी वरूनही या दोघांमध्ये वाद होते. अनेक राजकीय कार्यक्रमातही रामदास कदम, जाहीरपणे चंद्रकांत खैरे यांच्यावर सार्वजनिकपणे टिपण्णी करायचे. या दोघांच्या वादातच औरंगाबादच्या शिवसेनेत दोन गटही निर्माण झाले होते. याविषयी अनेक तक्रारी सुद्धा उद्धव ठाकरे यांच्याकडे गेल्या होत्या. औरंगाबादमध्ये निवडणुकीच्या तोंडावर सेना दोन गटात विभागली जाण्याची शक्यता निर्माण झाली होती. हे टाळण्यासाठीच रामदास कदम यांच्या कडून औरंगाबादचे पालकमंत्री पद काढून घेतल्याची राजकीय चर्चा औरंगाबाद मध्ये सुरू झालीय.

First published: January 17, 2018, 10:20 PM IST

ताज्या बातम्या