ऑगस्ट महिन्यात सुट्ट्याच सुट्ट्या !

ऑगस्ट महिन्यात सुट्ट्याच सुट्ट्या !

ऑगस्ट महिन्यात शासकीय कर्मचारी तसंच खासगी कंपनीतील कर्मचाऱ्यांसाठी सुट्टयांची चांगलीच चंगळ होणार आहे. लागून आलेल्या वीकएन्ड सुट्ट्यांमुळे अनेकांनी आत्तापासून वर्षी सहलीचं नियोजन करण्यात सुरूवातही केलीय.

  • Share this:

मुंबई, 1 ऑगस्ट : आजपासून सुरू झालेल्या ऑगस्ट महिन्यात शासकीय कर्मचारी तसंच खासगी कंपनीतील कर्मचाऱ्यांसाठी सुट्टयांची चांगलीच चंगळ होणार आहे. लागून आलेल्या वीकएन्ड सुट्ट्यांमुळे अनेकांनी आत्तापासून वर्षी सहलीचं नियोजन करण्यात सुरूवातही केलीय.

या महिन्यात सलग तीन आठवडे 'वीकेण्ड'ला धरून सार्वजनिक सुट्ट्या आल्या आहेत. त्यामुळे मधले एक वा दोन दिवस रजा टाकून अनेकांना सलग ५ ते ६ दिवसांचे सुट्ट्यांचे नियोजन करता येणार आहे. या महिन्यात ४ ऑगस्टला सुट्टी घेतली तर पुढचे ५ ते ७ ऑगस्टपर्यंतचे सलग तीन दिवस सुट्टीचे मिळून असा सलग ४ दिवसांचा मान्सून टुरिझमचा प्लॅन करता येऊ शकतो. त्यापुढच्या आठवड्यातही १२ आणि १३ ऑगस्ट रोजी शनिवार-रविवार, आणि १४ ऑगस्टला जन्माष्टमीची जोडून सुटी घेतल्यास १५ ऑगस्टला पुन्हा स्वातंत्र्यदिनाची सुट्टी, त्यानंतर १६ ऑगस्टला सुट्टी घेतल्यास १७ ला पतेतीची सुट्टी अशा सलग ६ दिवसा सुट्ट्या मिळणार आहेत.

त्यामुळे अनेकांनी या 'लॉन्ग लिव्ह' वीकएन्डचा नक्कीच आत्तापासूनच प्लॅन केला असणार आहे. त्यापुढच्या आठवड्यातही पुन्हा २५ ऑगस्टला शुक्रवारी गणेशोत्सव आणि त्यापुढे शनिवार, रविवार अशी सलग तीन दिवसांची सुट्टी घेता येऊ शकते.

ऑगस्ट महिन्यात बहुतांश धबधबे ओसंडून वाहत असतात त्यामुळे तुमच्या आवडीचं वर्षा सहलीचं ठिकाण आत्ताच निश्चित करून तुम्ही तुमचा वीकएन्ड मस्तपैकी एन्जॉय करू शकता.

ऑगस्ट महिन्यात जोडून आलेल्या सुट्ट्या

५-६ ऑगस्ट - वीकएन्ड

७ ऑगस्ट - रक्षाबंधन (वैकल्पिक रजा)

१२-१३ ऑगस्ट - वीकएन्ड

१४ ऑगस्ट - जन्माष्टमी (वैकल्पिक रजा)

१५ ऑगस्ट - स्वातंत्र्य दिन

१७ ऑगस्ट - पतेती

२५ ऑगस्ट - गणेश चतुर्थी

२६-२७ ऑगस्ट - वीकएन्ड

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 1, 2017 01:18 PM IST

ताज्या बातम्या