रामदास आठवले यांच्यावरील हल्ला निंदनीय -अर्जुन डांगळे

रामदास आठवले यांच्यावरील हल्ला निंदनीय -अर्जुन डांगळे

आमच्यात मतभेद आहेत. मात्र, अशाप्रकारे दलित संघटनेच्या नेत्यावर हल्ला ही बाब नंदनीय असल्याचं रिपब्लिकन नेते अर्जुन डांगळे म्हणाले. 

  • Share this:

अंबरनाथ, 08 डिसेंबर : रिपाइंचे नेते आणि केंद्रीय सामाजिक मंत्री रामदास आठवले यांच्यावर अंबरनाथमध्ये हल्ला करण्यात आला. व्यासपीठावरुन उतरत असताना एका तरुणाने रामदास आठवले यांच्या कानशिलात लगावली. रिपाइंच्या कार्यकर्त्यानी या तरुणाला पाहताच पकडले आणि बेदम चोप दिला. या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अंबरनाथमध्ये घडलेल्या या प्रकारानंतर रिपाइंचे नेते अर्जुन डांगळे म्हणाले की, आमच्यात मतभेद आहेत. मात्र, अशाप्रकारे दलित संघटनेच्या नेत्यावर हल्ला ही बाब नंदनीय असल्याचं रिपब्लिकन नेते अर्जुन डांगळे म्हणाले. 


अंबरनाथ पश्चिममध्ये विको नाका परिसरात नेताजी मैदानात संविधान दिनानिमित्तानं एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला रामदास आठवले आले होते. यावेळी आठवले यांनी जवळपास अर्धा तास भाषण केलं. भाषण आटोपल्यानंतर रामदास आठवले स्टेजवरून खाली उतरत होते. त्यावेळी एक तरुण त्यांच्याजवळ गेला. या तरुणानं आठवले यांच्याशी हुज्जत घातली. काही कळण्याच्या आता या तरुणाने अचानक रामदास आठवले यांच्या कानशिलात लगावली.


हा प्रकार घडल्यानंतर तिथे उपस्थिती असलेल्या रिपाइंच्या कार्यकर्त्यांनी या तरुणाला पकडलं आणि बेदम चोप दिला. त्यानंतर पोलिसांनी या तरुणाला ताब्यात घेतलं. या तरुणाने रामदास आठवले यांच्या कानशिलात का लगावली याची चौकशी पोलीस करत आहे.


 आठवले यांच्यावर हल्ला करणाऱ्या तरुणाला बेदम चोप, पहिला VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 8, 2018 11:25 PM IST

ताज्या बातम्या