एकतर्फी प्रेमातून कॉलेज तरुणीवर हल्ला.. माथेफिरूने घरात घुसून केले वार

एकतर्फी प्रेमातून कॉलेज तरुणीवर हल्ला.. माथेफिरूने घरात घुसून केले वार

आरोपी आतिष ढगे दुपारी 12 च्या सुमारास तरुणीच्या घरात घुसला. काही समजण्याच्या आत त्याने सोबत आणलेल्या धारदार शस्त्राने तरुणीच्या छाती, पोटावर सपासप वार केले.

  • Share this:

बब्बु शेख, (प्रतिनिधी)

लासलगाव, 6 सप्टेबर: एका माथेफिरूने कॉलेज तरुणीवर घरात घुसून धारदार शस्त्राने सपासप केले. ही कोटमगाव रस्त्यावरील दत्तनगर भागात शुक्रवारी दुपारी घडली. आतिष ढगे असे आरोपीचे नाव आहे. या हल्ल्यात तरुणी गंभीर जखमी झाली आहे. तरुणीवर लासलगावच्या रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर तिला नाशिक येथे हलविण्यात आले आहे. एकतर्फी प्रेमातून हा प्रकार घडल्याचे बोलले जात आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली असून काही संघटनांनी उद्या लासलगाव बंदची हाक दिली आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की,आरोपी आतिष ढगे दुपारी 12 च्या सुमारास तरुणीच्या घरात घुसला. काही समजण्याच्या आत त्याने सोबत आणलेल्या धारदार शस्त्राने तरुणीच्या छाती, पोटावर सपासप वार केले. तरुणीने आरडाओरड करताच कॉलनीतील इतर लोक तिच्या मदतीला धावून आले. लोक गोळा झाल्याचे पाहून आरोपीने स्वत:च्या अंगावरही वार केले. आरोपीने तरुणीवर तब्बल 18 वार केले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेला तरुणीला तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले. तिथे प्राथमिक उपचार केल्यानंतर तिला पुढील उपचारासाठी नाशिक येथे हलवण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. तसेच आरोपीला निफाड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिस घटनास्थळी पोहोचले. आरोपीने हल्ल्यात वापरलेले शस्त्र पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

मुंबईच्या पावसात सलमान निघाला सायकलवर, पाहा हा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 6, 2019 09:34 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading