News18 Lokmat

सावधान! ATM मधून कॅश काढण्याआधी चेक करा या गोष्टी; नाहीतर रिकामं होईल खातं

तुम्हाला तुमच्या खात्यातील पैसे सुरक्षित ठेवायचे असतील, तर ATM मधून पैसे काढताना तुम्ही काळजी घ्यायला हवी. अन्यथा तुमचं खातं रिकामं होऊ शकतं

News18 Lokmat | Updated On: Apr 26, 2019 07:05 AM IST

सावधान! ATM मधून कॅश काढण्याआधी चेक करा या गोष्टी; नाहीतर रिकामं होईल खातं

मुंबई, 25 एप्रिल : बँकांनी ATM मधून 24 तास पैसे काढण्याची सुविधा उपलब्ध करून दिली असल्यामुळे या सुविधेचा मोठ्या प्रमाणात उपयोग केला जात आहे. त्यात तुलनेत ATM मध्ये घडणाऱ्या फ्रॉड केसेसमध्येसुद्धा मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. जर तुम्हाला तुमच्या खात्यातील पैसे सुरक्षित ठेवायचे असतील, तर ATM मधून पैसे काढताना तुम्ही काळजी घ्यायला हवी. अन्यथा तुमचं खातं रिकामं होऊ शकतं

एटीएममधून पैसे काढू काढण्याआधी काही गोष्टी तुम्ही चेक करा. कारण कार्ड क्लोनिंगचा सर्वात मोठा धोका तुमच्यासोबत होऊ शकतो. कार्ड क्लोनिंग म्हणजे तुमच्या नकळत तुमची खात्याची माहीत चोरून तुच्या एटीएन कार्ड सारखंच दुसरं कार्ड तयार केलं जातं.

अशी चोरीला जाते तुमची माहिती..

युजर जेव्हा एटीएम कार्ड आपला डेटा मशीनमध्ये टाकतो तेव्हा हॅकर्स त्याची माहीती स्लॉटमधून चोरी करतात. त्या एटीएम मशीनच्या कार्ड स्लॉटमध्ये असं एक डिवाइस लावलं जातं, ज्याद्वारे तुमच्या कार्डमधली संपूर्ण माहिती स्कॅन केली जाते. त्यानंतर ब्लूटुथ किंवा एखाद्या वायरलेस डिव्हाईसच्या माध्यमातून तुमची माहिती चोरली जाते.

तुमचा पूर्ण पिन नंबर मिळाल्याशिवाय तुमच्या डेबिट कार्डचं पूर्ण एक्सेस हॅकर्सकडे जाऊ शकत नाही. त्यासाठी कॅमेऱ्याच्या माध्यमातून तुमचा पिन नंबर ट्रॅक केला जातो. तुमचा पिन नंबर हॅक होण्यापासू वाचवायचा असेल पिन नंबर टाकताना विशेष काळजी घ्यायला हवी.

Loading...

एटीएनमध्ये गेल्यानंतर कार्ड स्लॉटचा लाईट ब्लिंक होत आहे किंवा नाही हे आधी तपासून घ्या. जर कार्ड स्लॉटमध्ये काही फेरफार झालं असल्याची शंका तुमच्या मनात येत असेल तर त्या एटीएनचा अजिबात वापर करू नका. स्लॉटमध्ये कार्ड टाकताना त्याठिकाणी ब्लिंक होणाऱ्या हिरव्या लाईटवर लक्ष द्या. जर हिरवा लाईट सुरू असेल तर एटीएन सुरक्षित आहे असं समजावं. जर त्या ठिकाणी लाल दिवा लागलेला असेल किंवा कोणत्याच रंगाचा लाईट लागला नसेल तर त्या एटीएमचा अजिबात उपयोग करू नका. जर हॅकर्सच्या जाळ्यात तुम्ही फसला आहात आणि त्याच वेळेस बँकसुद्धा बंद असेल तर तात्काळ तुम्ही पोलिसांशी संपर्क साधावा.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 26, 2019 07:01 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...