एका युगाचा अस्त : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वाहिली श्रद्धांजली

एका युगाचा अस्त : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वाहिली श्रद्धांजली

माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या निधनामुळे मी नि:शब्द झालो आहे, शून्य झालो आहे. एका युगाचा अस्त झालाय अशी प्रतिक्रीया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलीय.

  • Share this:

नवी दिल्ली, ता.16 ऑगस्ट : माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या निधनामुळे मी नि:शब्द झालो आहे, शून्य झालो आहे. एका युगाचा अस्त झालाय अशी प्रतिक्रीया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलीय.

भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना नवी दिल्ली येथील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गेल्या तीन दिवसांपासून त्यांची प्रकृती जास्त बिघडल्यामुळे त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे होते. मागच्या नऊ आठवड्यांपासून त्यांच्यावर एम्स रुग्णालयात उपचार सुरू होता.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी संध्याकाळी रुग्णालयात जाऊन वाजपेयी यांच्या प्रकृतीविषयी डॉक्टरांकडून माहिती घेतली होती. त्यानंतर व्यंकय्या नायडू, केंद्रीय मंत्री पियूष गोयल, केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू, जितेंद्र सिंग तसेच हर्षवर्धन आणि अश्विनी कुमार चौबे यांनीही एम्स रुग्णालयाला भेट दिली. मागच्या दोन महिन्यांपासून वाजपेयींवर एम्स रुग्णालयात उपचार सुरु होते. किडनी संसर्गामुळे ११ जूनला वाजपेयींना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले.

२००९ पासून अंथरुणाला खिळून असलेले अटल बिहारी वाजपेयी हे डिमेंशिया आजाराने त्रस्त होते. डिमेंशिया म्हणजे स्मृतीभ्रंश. या आजारामध्ये वाढत्या वयानुसार माणसाची स्मरणशक्ती कमी होत जाते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 16, 2018 06:07 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading