अटल बिहारी वाजपेयी 'एम्स'मध्ये दाखल, प्रकृती स्थिर

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना दिल्लीच्या प्रसिद्ध ऑल ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल साइंसेस (AIIMS) मध्ये दाखल करण्यात आलंय. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं एम्सनं सांगितलं आहे.

Ajay Kautikwar | News18 Lokmat | Updated On: Jun 11, 2018 03:27 PM IST

अटल बिहारी वाजपेयी 'एम्स'मध्ये दाखल, प्रकृती स्थिर

नवी दिल्ली,ता.11 जून : माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना दिल्लीच्या प्रसिद्ध ऑल ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल साइंसेस (AIIMS) मध्ये दाखल करण्यात आलंय. 94 वर्षांचे वाजपेयी हे गेल्या काही वर्षांपासून डिमेंशिया ने आजारी आहेत.

वाजपेयी यांना नियमित चेकअपसाठी एम्स मध्ये दाखल करण्यात आलं आहे अशी माहिती भाजपने एक प्रसिद्धी पत्रक काढून दिली आहे. एम्स चे संचालक डॉ. रणदिप गुलेरिया यांच्या नेतृत्वाखालील डॉक्टरांची टीम वाजपेयी यांच्यावर उपचार करत असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं एम्सनं सांगितलं आहे.

प्रकृती अस्वस्थतेमुळं वाजपेयी यांनी सार्वजनिक जिवनातून निवृत्ती घेतली आहे. भाजपचे संस्थापक सदस्य असलेल्या वाजपेयींनी तीन वेळा देशाचं पंतप्रधानपद भूषवलं असून कार्यकाळ पूर्ण करणारे ते बिगर काँग्रेस पक्षाचे पहिलेच नेते आहेत.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 11, 2018 03:23 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close