Home /News /news /

लज्जास्पद! क्वारंटाईन सेंटरमध्ये रुग्णांच्या नातेवाईकांनी पुरावल्या दारूच्या बाटल्या, अशी रंगली पार्टी

लज्जास्पद! क्वारंटाईन सेंटरमध्ये रुग्णांच्या नातेवाईकांनी पुरावल्या दारूच्या बाटल्या, अशी रंगली पार्टी

    कोल्हापूर, 14 जून : राज्यात सध्या कोरोनामुळे हाहाकार पसरला आहे. अशात रुग्णांची संख्या ऐवढ्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे की क्वारंटाईन सेंटरसुद्धा कमी पडत आहे. पण कोल्हापूरच्या क्वारंटाईन सेंटरमध्ये धक्कायक प्रकार समोर आला आहे. इथे कोरोनामुळे हजारोंनी लोकांचा जीव चालला असताना कोल्हापुरात मात्र, क्वारंटाईनमध्ये असलेल्या लोकांनी जंगी पार्टी केल्याचं समोर आलं आहे. कोल्हापूर शहरातील एका क्वारंटाईन सेंटरमध्ये ओली पार्टी करण्यात आली आहे. बिसलेरी बॉटल्सच्या बॉक्समधून दारुच्या बॉटल क्वारंटाईन सेंटरमध्ये आल्या आणि मग काय मोठ्या थाटामाटात पार्टी पार पडली. शनिवारी रात्रीची ही घटना असल्याचं समोर आलं आहे. संबंधिताना केवळ तोंडी समज देण्यात आली असल्याचं सांगण्यात आलं आहे. या प्रकरणात मिळालेल्या माहितीनुसा, कोरोना झालेल्या रुग्णांच्या नातेवाईकांकडून दारूच्या बाटल्या आणि मटण पुरवण्यात आलं होतं. क्वारंटाईन सेंटरमध्ये झालेल्या या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. तर रुग्णालयाचं लक्ष नव्हतं का असाही प्रश्न विचारण्यात येत आहे. दरम्यान, शुक्रवारी राज्यात 3427 नवे रुग्ण आढळून आले आहेत त्यामुळे राज्यातल्या एकूण रुग्णांची संख्या 1 लाख 4 हजार 568वर गेली. तर दिवसभरात 113 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यातल्या मृतांची संख्या 3830 वर गेली आहे. कालही मुंबईत सर्वाधिक 69 मृत्यू मुंबईत झालेत तर पुण्यात 10 मृत्यू झाले. सर्वात जास्त रुग्णही मुंबईतच सापडले असून त्यांची संख्या दीड हजारांच्या वर आहे. काल 1550लोकांना डिस्चार्ज देण्यात आला. राज्यात आत्तापर्यंत 49 हजार 346 जणांना घरी सोडण्यात आले आहे. पुणे विभागातील 9 हजार 105 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 14 हजार 650 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 04 हजार 887 आहे. विभागात कोरोनाबाधीत एकुण 658 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 271 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 62.15 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली. संपादन - रेणुका धायबर
    Published by:Manoj Khandekar
    First published:

    Tags: Corona

    पुढील बातम्या