मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

राशीभविष्य : धनु आणि मीन राशीच्या व्यक्तींनी आज आर्थिक व्यवहार करताना सावधान

राशीभविष्य : धनु आणि मीन राशीच्या व्यक्तींनी आज आर्थिक व्यवहार करताना सावधान

कसा असेल आजचा आपला दिवस जाणून घ्या 26 जूनचं राशीभविष्य.

कसा असेल आजचा आपला दिवस जाणून घ्या 26 जूनचं राशीभविष्य.

कसा असेल आजचा आपला दिवस जाणून घ्या 26 जूनचं राशीभविष्य.

मुंबई, 26 जून : प्रत्येक दिवस सारखा नसतो. आपल्या राशीतील बदलत्या स्थितीचा परिणाम आपल्या दिवसावर होत असतो. येणाऱ्या समस्यांची पूर्वकल्पना आपल्याला मिळाली तर समस्या सोडवणं अधिक सोपं होतं यासाठीच जाणून घ्या कसा असेल आजचा आपला दिवस.

मेष- चिंता केल्यानं आज आपला आनंद खराब होऊ शकतो. चांगले परिणाम मिळवण्यासाठी स्वत:ला प्रोत्साहित करा. प्रवासासाठी दिवस चांगला नाही.

वृषभ- एकतर्फी प्रेमातून आपल्याला केवळ मनस्ताप मिळेल. चांगल्या गोष्टीत वेळ घालवा. आपल्या गरजा पूर्ण होण्यात बरेच अडथळे येतील.

मिथुन- व्यायामानं दिवसाची सुरुवात करा. प्रेमासाठी आजचा दिवस चांगला आहे. भागीदारी व्यवसायापासून दूर राहा.

हे वाचा-वस्तू आयात करणे चुकीचे नाही, पण चीनमधून गणेशमूर्ती का आयात करायच्या?

कर्क- आर्थिक योजनांमध्ये गुंतवणूक करण्यास टाळा. प्रेमात आज अनेक अडथळे येतील.

सिंह- चांगल्या वाईट गोष्टींचा सारासार विचार करून निर्णय घ्या. कुटुंबातील प्रत्येकाचं मत महत्त्वाचं आहे त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करू नका. अपेक्षेनुसार निकाल न आल्यास निराश होऊ नका. महत्त्वपूर्ण लोकांशी संवाद साधताना आपले शब्द काळजीपूर्वक वापरा.

कन्या- नवीन योजना किंवा कल्पना आज आपल्याला फायदा मिळवून देतील. प्रेमासाठी आजचा दिवस चांगला आहे.

तुळ- गुंतवणुकीतून आपल्याला फायदा होईल. आपल्या तणावाचं कारण कौटुंबिक सदस्य किंवा जोडीदार असू शकतो. अश्वासनं देणं टाळा.

वृश्चिक- अस्वस्थता तुमची मानसिक शांती बिघडू शकते. गुंतवणूक करण्याआधी विचार करा. कामाचा ताण अधिक असल्यानं मानसिक आणि शारीरिक थकवा जाणवेल.

हे वाचा-कोहलीशी करायचं होतं लग्न; इंग्लंडच्या या क्रिकेटरने सर्वांसमोर केलेलं प्रपोज

धनु- आर्थिक व्यवहार करताना सावधगिरी बाळगा. एकतर्फी प्रेम आपला आनंद बिघडवू शकते. सहकार्यांसह काम करताना आपल्याला कौशल्य आणि सूक्ष्मतेची आवश्यकता भासेल.

मकर - जोडीदाराच्या चांगल्या कामाचं कौतुक करा. कामाच्या ठिकाणी आज अधिक जबाबदारी आपल्याकडे येईल. वैवाहिक जीवनात नैराश्य येऊ शकतं.

कुंभ- रागावर नियंत्रण ठेवा. गुंतवणुकीतून फायदा होईल. समस्यांचा सामना करावा लागेल.

मीन-बँकेशी संबंधित व्यवहारांमध्ये खूप सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. कोणत्याही वचनात अडकू नका. मनोरंजनासाठी आज वेळ द्या.

संपादन- क्रांती कानेटकर

First published:

Tags: Astrology and horoscope, Horoscope