प्रसिद्ध ज्योतिषी बेजान दारुवाला यांचं ‘COVID-19’मुळे निधन

प्रसिद्ध ज्योतिषी बेजान दारुवाला यांचं ‘COVID-19’मुळे निधन

त्यांनी वर्तविलेले अनेक राजकीय अंदाज खरे ठरल्याने ते कायम चर्चेत राहिले. 2014मध्ये त्यांनी नरेंद्र मोदींबाबत भविष्य वर्तवलं होतं.

  • Share this:

अहमदाबाद 29 मे: प्रसिद्ध ज्योतिषी बेजान दारुवाला यांचं कोव्हिड-19’मुळे आज निधन झालं. ते 90 वर्षांचे होते. 22 मे रोजी त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. मात्र वय जास्त असल्याने उपचाराला प्रतिसाद मिळत नव्हता. त्यांना श्वास घ्यायला त्रास जात होता. त्यांना ऑक्सिजनही लावण्यात आला होता. मात्र त्याचा फारसा फायदा झाला नाही.

गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी दारुवाला यांच्या निधनाबद्दल दु:व्यक्त केलंय. दारुवाला हे टीव्ही आणि वृत्तपत्रांमधून भविष्य सांगायचं आणि लिहायचे.

त्यांनी वर्तवलेल्या अनेक अंदाजांबद्दल चांगलीच चर्चा झाली होती. ते सेलिब्रेटी ज्योतिषी होते. त्यांनी अनेक राजकीय अंदाज वर्तवले होते. त्यामुळे ते कायम चर्चेत राहत असत.

First published: May 29, 2020, 8:15 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading