मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /बापरे! पृथ्वीच्या दिशेन येतंय महाकाय संकट, मार्चमध्ये विशाल Asteroid जाणार जवळून

बापरे! पृथ्वीच्या दिशेन येतंय महाकाय संकट, मार्चमध्ये विशाल Asteroid जाणार जवळून

Largest Asteroid of 2021

Largest Asteroid of 2021

पृथ्वीवर एक नवीन संकट घोंगावत आहे. एक हजार मीटर रुंदीचा महाकाय लघुग्रह (Asteroid) 21 माइल्स प्रतिसेकंद या वेगाने अंतराळात घिरट्या घालत असून येत्या 21 मार्चला हा लघुग्रह पृथ्वीच्या दिशेने येणार आहे.

नवी दिल्ली, 05 फेब्रुवारी : पृथ्वीवर एक नवीन संकट घोंगावत आहे. एक हजार मीटर रुंदीचा महाकाय लघुग्रह (Asteroid) 21 माइल्स प्रतिसेकंद या वेगाने अंतराळात घिरट्या घालत असून येत्या 21 मार्चला हा लघुग्रह पृथ्वीच्या दिशेने येणार आहे. '2001 FO32' नामक हा लघुग्रह(Asteroid) पृथ्वीवर आदळला तर मोठा हाहाकार उडू शकतो. अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था नासाच्या (National Aeronautics and Space Administration NASA) मते याची कक्षा फार मोठी असून यामुळं काय नुकसान होऊ शकतं हे अजूनपर्यंत समोर आलेलं नाही.

नेहमी कोसळणाऱ्या उल्कांपेक्षा या खडकाचा आकार खूप मोठा आहे. Earth Sky ने दिलेल्या रिपोर्टनुसार,या लघुग्रहाची (Asteroid) कक्षा जवळपास 1 किलोमीटर रुंद कक्षा आहे. 21 मार्चला संध्याकाळी साडेनऊ वाजता हा लघुग्रह(Asteroid) पृथ्वीच्या जवळून जाईल. यावेळी हा लघुग्रह पृथ्वीच्या 1.3 दशलक्ष मैल (2,016,351 किमी) किंवा 5 चंद्र अंतरावर असणार आहे. या महाकाय ग्रहाचा वेग (Speed)  हा सर्वसामान्य ग्रहांपेक्षा 97 पट अधिक आहे. त्यामुळं उघड्या डोळ्यांनी हा ग्रह दिसत असून वैज्ञानिक अतिशय मोठ्या दुर्बिणीच्या (Telescope) साहाय्याने त्यावर लक्ष ठेवून आहेत. बर्‍याच लघुग्रहांसह हे शक्य होतनाही कारण या दुर्बिणीद्वारे त्यांना शोधण्यात 5 ते 10 मिनिटे लागतात.

(हे वाचा-Gold Price Today: चार दिवसांच्या घसरणीनंतर सोन्याचांदीला झळाळी, वाचा नवे दर)

तब्बल 200 वर्षांनंतर हा लघुग्रह पृथ्वीजवळून जात आहे. 21 मार्चनंतर पुन्हा 31 वर्षांनी 22 मार्च 2052 ला हा लघुग्रह पृथ्वीजवळून जाणार आहे. विविध प्रदेशातील निरीक्षकांना यासाठी खास सूचना देण्यात आल्या आहेत. यामध्ये दक्षिणेकडील आकाशात लघुग्रह(Asteroid) तुलनेने खाली आहे, यामुळं  जेव्हा पृथ्वीच्या जवळून जाईल तेव्हा दक्षिणेच्या नक्षत्रातून जात असताना उत्तरेकडील निरीक्षकांना लघुग्रह दिसण्यास मदत होणार आहे.

(हे वाचा - मोठी बातमी : काळवीट शिकार प्रकरणात सलमान खानला जोधपूर हायकोर्टाकडून दिलासा)

दरम्यान,पृथ्वी लघुग्रह संशोधन म्हणजेच LINEAR ला हा लघुग्रह सर्वात आधी 23 मार्च 2001 ला आढळून आला होता. न्यू मेक्सिकोच्या सॉकोरो येथे या ग्रहाचा शोध लागला होता. यामध्ये लिंकन लॅबोरेटरीच्या प्रयोगात्मक चाचणी साइटवर (ETS) उपलब्ध असलेल्या साधनांचा वापर करण्यात आला होता.हा ग्रह त्याच्या कक्षाद्वारे दर 810 दिवसांनी सूर्याभोवती फिरतो.

First published:

Tags: India