पालघर, 04 जानेवारी : पालघरमध्ये सफाळे पोलीस स्टेशनमधील सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप वसंत सानप (वय 38 वर्ष)यांचा ह्रदयविकाराचा तीव्र झटका आल्याने मृत्यू झाला आहे. संदीप सानप हे मूळचे नाशिकचे राहणारे असल्याचे सांगण्यात येत आहे. क्रिकेट खेळताना संदीप यांना हृदयविकाराच झटका आला. त्यांच्या अशा जाण्यामुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.
गेल्या वर्षभरापासून सफाळे पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी म्हणून नियुक्त होते. त्यांच्या पार्थिवावर त्यांच्या मूळ गावी नाशिक इथे अंत्यसंस्कार होणार आहेत. रायझिंग डे सप्ताहानिमित्त पालघर तालुक्यतील सर्व पोलीस स्टेशन अंतर्गत सफाळे येथील मकुणसार भागात आज क्रिकेटचे सामने घेण्यात आले होते. त्यावेळी मैदानात खेळत असताना सानप यांना मेजर अटॅक आला.
यावेळी त्यांना तत्काळ वसई इथल्या प्लॅटिनम हॉस्पिटलमध्ये नेण्यात आसं पण त्याच वेळी त्यांचा मृत्यू झाल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं. सानप यांच्या जाण्याची बातमी वाऱ्यासारखी सगळीकडे पसरली. सानप यांच्या अकाली मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे.
इतर बातम्या - बच्चू कडू म्हणतात, 'हेमामालिनींच्या घराजवळ बंगला द्यावं अशी मागणी नव्हती'!
Published by:Renuka Dhaybar
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.