मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

Assembly Election Result 2018 LIVE : तेलंगणात योगींची 'जादू' चालली नाही

Assembly Election Result 2018 LIVE : तेलंगणात योगींची 'जादू' चालली नाही

लोकांनी त्यांच्या भडकाऊ भाषणांना दाद दिली नाही हे स्पष्ट झालंय. योगींनी हिंदु मतांचं ध्रुविकरण करण्याचा प्रयत्न केला होता.

लोकांनी त्यांच्या भडकाऊ भाषणांना दाद दिली नाही हे स्पष्ट झालंय. योगींनी हिंदु मतांचं ध्रुविकरण करण्याचा प्रयत्न केला होता.

लोकांनी त्यांच्या भडकाऊ भाषणांना दाद दिली नाही हे स्पष्ट झालंय. योगींनी हिंदु मतांचं ध्रुविकरण करण्याचा प्रयत्न केला होता.

हैदराबाद, 11 डिसेंबर : तेलंगणात सत्ताधारी टीआरएसचं पारडं जड  आहे. मतमोजणी सुरू होताच सत्ताधारी टीआरएस ने आघाडी घेतलीय.यात टीआरएस ने पहिल्या काही तासातच 40 पेक्षा जास्त जागांची आघाडी घेतली. तेलंगणात योगी आदित्यनाथ यांनी जोरदार प्रचार केला होता मात्र त्यांची जादू चालली नाही. लोकांनी त्यांच्या भडकाऊ भाषणांना दाद दिली नाही हे स्पष्ट झालंय. योगींनी हिंदु मतांचं ध्रुविकरण करण्याचा प्रयत्न केला होता.

हैदराबादमध्ये पाच लाख मतदार असून गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्याला लागून असलेल्या भागातही मराठी मतदारांची संख्या मोठी आहे. त्यामुळे या भागातून काय निकाल येतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनक नेते आणि आमदारांनी या भागात प्रचार केला होता.

तेलंगणा राज्याची निर्मिती झाल्यानंतर विधानसभेची दुसरी निवडणूक पार पडत आहे तब्बल 119 जागांसाठी होणार्‍या निवडणुकीत  1761 उमेदवार रिंगणात आहेत स्वतंत्र तेलंगणा निर्मितीचे श्रेय घेऊन गेल्या सत्तेवर आलेल्या तेलंगणा राष्ट्र समिती समोर सत्ता टिकवण्याचं आव्हान आहे तर एकमेकाचे परंपरागत विरोधी असलेले काँग्रेस आणि टीडीपी या निवडणुकीत एकत्र येऊन त्यांनी महाआघाडी बनवल्याने ही निवडणुक कुठल्याही परिस्थितीत जिंकणे टीआरएससाठी आवश्यक झाले आहे.

हैदराबाद शहरांमध्ये असदुद्दीन ओवेसी यांच्या एमआयएम पक्षाने आपल्या गेल्यावेळी जिंकलेल्या जागा कायम राखण्यासाठी जुन्या हैदराबाद शहरावर लक्ष केंद्रीत केलं होतं.  सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे हैदराबाद शहरांमध्ये असणारे पाच लाख मराठी भाषिक  या निवडणुकीत महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत.

गेल्यावेळी स्वतंत्र तेलंगणा राज्याच्या निर्मितीच्या श्रेयावरून विधानसभेची पहिली निवडणूक गाजली होती आणि या निवडणुकीत काँग्रेसने पूर्णपणे आपली ताकद पणाला लावली होती मात्र तेलंगणा निर्मितीसाठी आंदोलन करणारे तेलंगणा राष्ट्र समितीचे प्रमुख के चंद्रशेखर राव यांच्या पक्षाला मोठ्या प्रमाणात जनसमर्थन मिळाले आणि सर्वाधिक 63 जागा तब्बल 34 टक्के मते मिळवून टीआरएसणे तेलंगणामध्ये सत्ता पटकावली होती.

तेलंगणा निर्मितीचं श्रेय घेण्यासाठी गेल्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाने प्रचारामध्ये मोठ्या प्रमाणात आपली ताकद पणाला लावली होती मात्र जनतेने तेलंगाना राष्ट्र समितीला तब्बल 34 टक्के मते देऊन 63 जागा दिल्या होत्या दुसरीकडे काँग्रेस पक्षाला 25 टक्के मते पडून तब्बल 21 जागा काँग्रेसने जिंकल्या होत्या तर पक्षाने 14 टक्के मते मिळवून तब्बल 15 जागा जिंकल्या होत्या. मात्र गेल्या साडेचार वर्षात के चंद्रशेखर राव यांनी  टीडीपी आणि काँग्रेसच्या आमदारांना मोठ्या प्रमाणात आपल्या पक्षामध्ये सामील करून घेतल्याने या दोन्ही पक्षांना धक्का बसला होता.

गेल्या काही दिवसांपासून तेलंगणाची विधानसभा बरखास्त करून विधानसभा निवडणूक चर्चा होती आणि ती चर्चा खरी ठरली. विधानसभा निवडणुकीला सहा महिने उरले असतानाच के चंद्रशेखर राव यांनी ही विधानसभा बरखास्त करून निवडणुकीत जनतेच्या समोर जाणं पसंत केलं .

 

First published:

Tags: Asaduddin owaisi, Chandrababau naidu, Chandrashekhar rao, Counting election 2018 telangana, Kcr, असादुद्दीन ओवेसी, आंध्र प्रदेश, चंद्रशेखर राव, चंद्राबाबू नायडू, तेलंगणा