Assembly Election Result 2018 LIVE : तेलंगणात TRSचा झेंडा, महाआघाडीचा धुव्वा!

Assembly Election Result 2018 LIVE : तेलंगणात TRSचा झेंडा, महाआघाडीचा धुव्वा!

लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीनेही आता केसीआर यांचं महत्व वाढणार आहे. त्यांना आपल्या बाजूने वळविण्यासाठी भाजप प्रयत्न करत आहे.

  • Share this:

हैदराबाद, 11 डिसेंबर : तेलंगणाच्या स्थापनेनंतर झालेल्या पहिल्याच निवडणुकीत तेलंगणा राष्ट्र समिती म्हणजेच टीआरएसने विक्रमी कामगिरी केली. टीआरएसला तेलंगणात दोन तृतीआंश बहुमत मिळालं. मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांचा करिष्मा कायम राहिला. त्यांच्या या झंझावतात इतर सर्वच पक्षांची पार वाताहात झाली. तेलुगू देशमने काँग्रेस सोबत आघाडी केली  आणि इतर छोट्या पक्षांना सोबत घेतलं होतं मात्र त्या सर्वच जनतेनं नाकारलं.

सकाळी 8 वाजता मतदानाला सुरुवात झाल्यापासूनच TRS ने मतमोजणीत आघाडी घेतली होती. सुरुवातीला त्यांनी घेतलेली आघाडी शेवटपर्यंत वाढत गेली. जस जसे निकाल लागत होते तस तसे टीआरएसच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष आणि उत्साह वाढत होता.

119 जागा असलेल्या विधानसभेत बहुमतासाठी 60 जागांची आवश्यकता आहे. मात्र टीआरएसने हा आकडा केव्हाच ओलांडला. तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव हे गजवेल या मतदारसंघातून तब्बल 51,515 मतांनी विजयी झाले. सगळ्यांचं लक्ष गजवेलकडे लागलं होतं.

या मतदार संघांवर त्यांची मोठी पकड आहे. काँग्रेसकडून वंतेरू प्रताप रेड्डी तर भाजपकडून अंकुला विजया या मुख्यमंत्र्यांविरूद्ध उमेदवार होत्या. 2014 मध्ये ते वंतेरू प्रताप रेड्डी यांचा पराभव करुन विधानसभेत गेले होते.

जुन्या हैदराबादमधून MIM चे नेते आणि असादुद्दीन ओवेसी यांचे भाऊ अकबरुद्दीन ओवेसी विजयी झालेत. त्यांनी काँग्रेस-तेलुगू देशम आघाडीच्या उमेदवाराचा पराभव केला. त्यांनी चंद्रयानगुट्टामधून विजय मिळवला. हा त्यांचा सलग पाचवा विजय आहे.

तेलंगणा विधानसभेच्या 119 जागांपैकी AIMIMने फक्त 07 जागा लढवत आहे. या सर्व जागा या जुन्या हैदराबाद मधल्या मुस्लिमबहुल भागातल्या आहेत. या भागात असलेलं आपलं वर्चस्व त्यांनी कायम राखल.

TRS ला 2013 मध्ये 63 जागा मिळाल्या होत्या त्यात यावेळी घसघशीत वाढ झाली. तर 37 जागांवर असलेला काँग्रेसच्या जागांमध्ये घट झाली.

तेलंगणाच्या निर्मितीसाठी चंद्रशेखर राव यांनी मोठा संघर्ष केला होता. उपोषण करुन आपले प्राणही त्यांनी पणाला लावले होते. याची लोकांना अजुनही आठवण आहे. याचा फायदा घेत राव यांनी राज्याचे संस्थापक म्हणून प्रतिमा उंचावण्यात यश मिळवलं.

लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीनेही आता केसीआर यांचं महत्व वाढणार आहे. त्यांना आपल्या बाजूने वळविण्यासाठी भाजप प्रयत्न करत आहे.

First published: December 11, 2018, 5:22 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading