PHOTOS : मध्य प्रदेशातल्या भाजपच्या पराभवाची ही आहेत 10 कारणं!

लोक जुन्या लोकांना कंटाळली होती. याचा अंदाज न आल्याने भाजपने अनेक जुन्या चेहेऱ्यांना संधी दिली आणि लोकांनी त्यांना नाकारलं. त्यामुळं 15 वर्षाची सत्ता गमवावी लागली.

  • Share this:

मध्य प्रदेशात शिवराजसिंग चौहान गेल्या 15 वर्षांपासून सत्तेत आहे. त्यामुळं लोकांच्या नाराजीचा सामना त्यांना करावा लागला. राज्य सरकारचा प्रशासनावर धाक राहिला नव्हता. लोकांची कामं होत नव्हती त्यामुळे लोकांनी सरकार विरोधात मतदान केलं.

मध्य प्रदेशात शिवराजसिंग चौहान गेल्या 15 वर्षांपासून सत्तेत आहे. त्यामुळं लोकांच्या नाराजीचा सामना त्यांना करावा लागला. राज्य सरकारचा प्रशासनावर धाक राहिला नव्हता. लोकांची कामं होत नव्हती त्यामुळे लोकांनी सरकार विरोधात मतदान केलं. (सर्व फोटो सौजन्य - पीटीआय)

शिवराज सिंग यांची वयक्तिक प्रतिमा चांगली असली तरी आता भाजपचं सरकार नको अशी जनतेची भावना होती. आमदार आणि स्थानिक नेत्यांचा अहंकार आणि सत्तेच्या गुर्मीमुळे लोकांनी त्यांना नाकारलं.

नोटबंदी आणि त्यानंतरच्या जीएसटीमुळे व्यापाऱ्यांना फटका बसला. हाच मध्यमवर्ग हा भाजपचा मतदार आहे. त्यामुळं या जाचक कायद्यांविरोधात लोकांनी आपला रोष व्यक्त केला.

अपुरा पाऊस आणि अनेक भागात दुष्काळाची स्थिती होती. शेतीमालाला पुरेसा भावही मिळत नसल्याने शेतकऱ्यांची आंदोलनं झालीत. सरकारनं शेतकऱ्यांच्या दु:खाची दखल योग्य पद्धतीने घेतली नव्हती.

भ्रष्टाचारामुळे लोक नाराज होते. नेते आणि अधिकाऱ्यांचे हितसंबध निर्माण झाल्याने खालपर्यंत भ्रष्टाचार बोकाळला होता. लोक भ्रष्टाचाराला कंटाळले होते. त्यामुळं त्यांनी सत्ता परिवर्तनाला पसंती दिली.

गोरक्षा, मंदिर आणि इतर धार्मिक विषयांवर भाजपने जोर दिल्याने सर्वसमावेशक अशी जी भाजपची प्रतिमा होती ती प्रतिमा बदलली. लोकांना विकास पहिजे होता. त्यांना शांतता पाहिजे होती. भाजपच्या कट्टरतावादी धोरणाला जनतेने दिलेली ही चपराक आहे. असं मानलं जातंय.

काँग्रेसने गेली काही वर्ष सातत्याने आंदोलनं करत शिवराज सिंग चौहान सरकारला जेरीस आणलं. मात्र सरकारने काँग्रेसच्या या आंदोलनाची दखल घेतली नाही सरकार आपल्याच अहंकारात राहिलं.

काँग्रेसचे नेते ज्योतिरादित्य शिंदे आणि ज्येष्ठ नेते कमलनाथ यांना राहुल गांधींनी चेहेरा म्हणून पुढे केलं. अनेक वर्ष सत्तेपासून दूर राहिल्याने ते लोकांमध्ये जास्त मिसळले तर शिवराज आणि त्यांचे मंत्री लोकांपासून दूर गेले त्यामुळं त्यांना अंदाज आला नाही.

सरकारने भरमसाठ आश्वासन दिली होती. मात्र ती पूर्ण केली नाही. त्यामुळे लोकांचा सरकारवर राग होता. शेतकरी, व्यापारी, कर्मचारीवर्ग नाराज असल्याचा फटका त्यांना बसला.

सरकारने भरमसाठ आश्वासन दिली होती. मात्र ती पूर्ण केली नाही. त्यामुळे लोकांचा सरकारवर राग होता. शेतकरी, व्यापारी, कर्मचारीवर्ग नाराज असल्याचा फटका त्यांना बसला.

लोक जुन्या लोकांना कंटाळली होती. याचा अंदाज न आल्याने भाजपने अनेक जुन्या चेहेऱ्यांना संधी दिली आणि लोकांनी त्यांना नाकारलं. त्यामुळं 15 वर्षाची सत्ता गमवावी लागली.

लोक जुन्या लोकांना कंटाळली होती. याचा अंदाज न आल्याने भाजपने अनेक जुन्या चेहेऱ्यांना संधी दिली आणि लोकांनी त्यांना नाकारलं. त्यामुळं 15 वर्षाची सत्ता गमवावी लागली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 11, 2018 04:07 PM IST

ताज्या बातम्या